दौंडमध्ये गुणवंत विद्यार्थी , शिक्षक , मुख्याध्यापकांचा सन्मान

दिनेश पवार:दौंड

दौंड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ,रोटरी क्लब ऑफ दौंड व क्रिएटिव्ह कम्प्युटर दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मधील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या १३० विद्यार्थ्यांचा तसेच, गुणवंत मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ अष्टविनायक मंगल कार्यालय एस. आर. पी. एफ. ग्रुप नंबर ७ दौंड येथे संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे साहेब होते.

यावेळी सहाय्यक समादेशक दादाराव सानप, सिपला फाउंडेशनच्या क्लस्टर हेड उल्का धुरी, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुण थोरात, माजी सचिव आदिनाथ थोरात, पुणे जिल्हा सचिव प्रसाद गायकवाड, रोटरी क्लब ऑफ दौंड चे रो. हरिश्चंद्र ठोंबरे, रो. प्रज्ञा राजोपाध्याय,राकेश अग्रवाल तसेच मेडिकल असोसिएशन दौंड चे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बारंगळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र नातू यांनी केले, सूत्रसंचालन सचिव अशोक भुजबळ यांनी केले, तर आभार अमीर शेख यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.राजेश दाते, क्रिएटिव्ह कम्प्युटरचे संचालक उल्हास मिसाळ, व राज्य राखीव पोलीस व पब्लिक स्कूल, गट- ७ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleदौंड पोलीस व यवत पोलिसांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन
Next articleयवत येथे कानाखाली चापट मारली म्हणून केला धारदार शस्त्राने खून