नायगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जितेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

नायगाव (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश गुलाब चौधरी यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदी जितेंद्र पांडुरंग चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलचे वतीने सरपंच पदासाठी जितेंद्र पांडुरंग चौधरी यांचा एकच अर्ज भरण्यात आला असल्याने सरपंच पदी जितेंद्र पांडुरंग चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी नूरजहा सय्यद मंडल अधिकारी उरुळी कांचन यांनी घोषित केले.

यावेळी ग्रामसेवक विजया भगत उपस्थित होत्या. नायगाव ग्रामपंचायतीत राजेंद्र रतन चौधरी गटाचे ११ पैकी ८ सदस्य निवडून आलेले असल्याने गटाची एक हाती सत्ता असल्याने गटाचे धोरणानुसार सर्वांना पदाची संधी देण्याचे अनुषंगाने सरपंच निवड करण्यात आल्याचे पॅनल प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

यावेळी तलाठी निवृत्ती गवारी, उपसरपंच उत्तम शेलार, ग्रा.प. सदस्य गणेश गुलाब चौधरी, कल्याणी संदीप हगवणे, पल्लवी नवनाथ गायकवाड, दत्तात्रय गणपत बारवकर, अश्विनी योगेश चौधरी, संगीता रघुनंदन शेलार, आरती अमोल चौधरी, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र पवार‌, संजय चौधरी, कैलास चौधरी, पोपट चौधरी, उत्तम घुले, नितीन हगवणे, संतोष हगवणे, कृष्णा चौधरी, प्रकाश चौधरी, सुरेश हगवणे, नामदेव चौधरी, विजय चौधरी, हेमंत चौधरी, पडीत चौधरी, संजय कामठे, नितीन चौधरी, सुनिल हागवणे, अमोल चौधरी, गणेश चौधरी, गुलाब पांडुरंग चौधरी, गोरख चौधरी, शिवाजी नामदेव चौधरी, भाऊसाहेब चौधरी, आबासाहेब चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.

Previous articleशिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना गती- संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांची माहिती
Next articleदिपक गृह स्कूलची कराटे मध्ये नेत्रदिपक कामगिरी