स्वजिल्ह्यात बदलीने येण्यासाठी शिक्षकांना संधी निर्माण करु-आमदार दिलीप मोहिते पाटील

Ad 1

राजगुरुनगर-गेली अनेक वर्ष केवळ आपल्या जिल्ह्यात जागा शिल्लक नाहीत म्हणून वेटींगवर असणार्‍या परजिल्ह्यात सेवा करणार्‍या शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्यासाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करु असे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला सांगितले. (दि.१६ )रोजी प्राथमिक शिक्षकांच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नती संदर्भात खेडचे विद्यमान आमदार दिलीपरा मोहीते पाटील यांची भेट घेऊन आंतर जिल्हा बदली संघर्ष समिती पुणे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले .

या भेटीमध्ये जिल्ह्यात शिक्षकांच्या विविध पदांच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नती करण्यात याव्यात तसेच त्यामुळे रिक्त होणाऱ्या उपशिक्षक पदावर अनेक वर्षांपासून पर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात येण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या शिक्षक बंधू भागिनींस स्वजिल्ह्यात येण्यास जागा निर्माण होतील व त्यांची कौटुंबिक अडचण, जिल्हा दुरावा दूर होईल याविषयी सविस्तर चर्चा झाली .यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी सखोल चर्चा करतो आणि गरज भासल्यास नामदार अदिती तटकरे व संबंधित अधिकार्‍यांना भेटून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वस्त केले.

यावेळी आंतरजिल्हा संघर्ष समितीचे प्रतिनीधी शरद राळे ( रायगड ), राज्य शिक्षक संघाचे मा.उपाध्यक्ष संजय राळे , खेड तालुका शिक्षक संघाचे मा. अध्यक्ष धर्मराज पवळे उपस्थित होते.

जाहिरात