स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्पर्धेमध्ये धामणे शाळेचे यश !

चाकण – पाईट (ता.खेड) येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित बीटस्तरीय स्पर्धांमध्ये धामणे प्राथमिक शाळेने दैदिप्यमान कामगिरी केली. वक्तृत्व स्पर्धा (लहान व मध्यम गट), प्रश्नमंजूषा स्पर्धा (लहान गट), सामान्य ज्ञान स्पर्धा (मोठा गट) यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून धामणे शाळा अव्वल ठरली असल्याची माहिती मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली.

पाईट बीटमधील किवळे, शिवे, रौंधळवाडी, पाळू आणि आडगाव या पाच केंद्रांमधील शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेचे नियोजन शिक्षण विस्तार अधिकारी सुनंदा शेवकरी, केंद्रप्रमुख भारती उबाळे, मिलिंद येवला, कैलास संभूदास आदींनी केले.

स्पर्धा प्रकार, प्रथम क्रमांक व शाळेचे नाव पुढीलप्रमाणे~
१) वक्त्तृत्व स्पर्धा लहान गट प्रथम क्रमांक- दुर्वा आवारी- शाळा धामणे. वक्त्तृत्व मध्यम गट प्रथम क्रमांक- हर्षाली कोळेकर- शाळा धामणे. वक्तृत्व मोठा गट प्रथम- संचिता चोरघे-शाळा रौंधळवाडी.
२) प्रश्नमंजूषा मध्यम गट प्रथम क्रमांक – वेदांत बारवेकर- शाळा धामणे. मोठा गट- सार्थक शिवेकर – शिवे
३) सामान्य ज्ञान स्पर्धा मध्यम गट प्रथम क्रमांक – वेदांत बारवेकर -शाळा धामणे. सामान्यज्ञान मोठा गट- सार्थक शिवेकर-शिवे
४) निबंध स्पर्धा मध्यम गट प्रथम – संभव दरेकर- पापळवाडी, मोठा गट – रसिका रौंधळ – पाईट.
५) वेशभूषा स्पर्धा लहान गट प्रथम- अपुर्वा लवंगे-चांदूस, मध्यम गट- तिर्था रौंधळ -रौंधळवाडी, मोठा गट- स्वराली रौंधळ – रौंधळवाडी
६) चित्रकला स्पर्धा लहान गट प्रथम- आवडी केदारी- पवारवाडी, मध्यम गट – अथर्व म्हसे- किवळे. मोठा गट – अनुष्का खेंगले – पाईट
यशस्वी विद्यार्थ्यांना खेड पंचायत समितीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी धामणे शाळेचे अध्यक्ष बाबाजी सातपुते, मुख्याध्यापक धर्मराज पवळे, माऊली बारवेकर, सत्यवान भोकसे, अनिल बोर्‍हाडे उपस्थित होते.

धामणे शाळेचे शिक्षक अमर केदारी, मंगल निमसे यांनी यशस्वी स्पर्धकांची तयारी करुन घेतली. प्रथम क्रमांक मिळविलेले स्पर्धक तालुका पातळीवरील स्पर्धेसाठी सहभागी होतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद बाणखिले यांनी केले, सत्यवान गाडे यांनी आभार मानले.

Previous articleवाबळेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या “परीसस्पर्श” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
Next articleवाघोली येथील बी.जे.एस विद्यालयास जिल्हा स्तरीय ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार