माहिती सेवा समितीचे हवेली तालुका उपाध्यक्ष अजित साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त रामदरा परीसरात वृक्षारोपण

उरुळी कांचन

माहिती सेवा समितीचे हवेली तालुका उपाध्यक्ष अजित साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर रामदरा परीसरात केले. १०० झाडांचे वृक्षारोपण उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिरुर- हवेली परीसरात लाखो झाडे लाऊन जगवणारे वृक्ष मित्र माहिती सेवा समिती अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, अजित मोहन साळुंके यांना माहिती सेवा समिती हवेली तालुका उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र वारघडे यांचे हस्ते देण्यात आले.

कार्यक्रमासाठी उपस्थीतामध्ये कमलेश बहिरट अध्यक्ष हवेली तालुका माहिती सेवा समिती, सतीश जगताप संघटक माहिती सेवा समिती, अमित साळुंके, मयूर साळुंके, प्रज्योत साळुंके, विनोद जाधव, शंकर पवार, ऋतिक काळभोर, बापू काळभोर, अवि कोळपे, नामदेव केसकर, दिपक काळभोर, प्रविण काळभोर, विकास काळभोर, अभिजीत भंडलकर, सुनिल लांडगे, पत्रकार अनिकेत मुळीक, अजिक्य उपाध्ये अजय पवार, प्रकाश डोळस, प्रतीक खंडेलवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

येत्या वर्षभरात १००० झाडे लाऊन ती जगवण्याचे आश्वासन अजित साळुंखे यांनी दिले. पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleआदिवासी अन्न वस्त्र निवारा पासुन वंचित- मधुकर पिचड
Next articleसंघटीत- असंघटित ,कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी भारतीय मजदूर संघ उतरणार रस्त्यावर