इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी प्रीती शहा

नारायणगाव : (किरण वाजगे)

इनरव्हील क्लब नारायणगाव या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थेच्या वतीने आगामी वर्षभरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रीती शहा यांनी दिली.इनरव्हील क्लब नारायणगाव यांचा पदग्रहण समारंभ प्रणव मंगल कार्यालयात नुकताच उत्साहात पार पडला. इनरव्हील क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सुजाता भुजबळ यांनी क्लबचा पदभार नवीन अध्यक्षा प्रीती शहा यांच्याकडे सोपविला. यावेळी महिला कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

या कार्यक्रमाला भीमाशंकर साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालिका पुष्पलता जाधव, मुख्याध्यापिका अनघा साने, रोटरी क्लबचे जिल्हा समन्वयक प्रा डॉक्टर पंजाबराव कथे, उद्योजक अशोक गांधी, नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे, उद्योजक संजय मुथ्था, प्रशांत शहा, एडवोकेट राम भालेराव, जितेंद्र बिडवई, अभय खैरे, रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर, ज्ञानेश्वर थोरवे, रूपाली शहाणे, एडवोकेट सुनिता चासकर, एडवोकेट रत्ना हांडे, हेमंत कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अध्यक्षा प्रिती शहा यांनी आगामी काळात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धाश्रम यांच्यासाठी ठोस कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

इनरव्हील क्लब ची नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्षा प्रीती शहा, उपाध्यक्ष सविता खैरे, सचिव रश्मी थोरवे, खजिनदार एडवोकेट सुनिता चासकर, आयएसओ अंजली खैरे, एडिटर समृद्धी वांजगे.
दरम्यान मागील वर्षाच्या कामाचा आढावा अंजली खैरे यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रीती खैरे यांनी केले. आभार सविता खैरे यांनी मानले.

Previous articleकासुर्डी, भरतगावात उद्या महाशिबीराचे आयोजन
Next articleविरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिव तक्रार येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप