कासुर्डी, भरतगावात उद्या महाशिबीराचे आयोजन

उरुळी कांचन

७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा, सुवर्णकन्या फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आपले सरकार सेवा केंद्र यवत, कासुर्डी,भांडगाव यांच्या संकल्पनेने संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, ई श्रम कार्ड वाटप या सर्वांचा शिबिर (कॅम्प) कासुर्डी फाटा येथे आपले सरकार सेवा केंद्र मध्ये आयोजित केलेला आहे.

सदर शिबीर योजना शुक्रवार दिनांक २२ जुलै ते २५ जुलै यामध्ये चालू राहील. कासुर्डी, कामटवाडी, जावजीबुवाची वाडी, भरतगाव ही महसूली गावे वेगवेगळी आहेत. तसेच पंचक्रोशीतील इतरही गावांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सदर शिबिरामध्ये गावातील निराधार विधवा महिला, घटस्फोटीत महिला, परितक्त्या, अपंग, अंध, तसेच वयस्कर आधार नसलेल्या आजी-आजोबा यांना शासनातर्फे दर महिना एक हजार रुपये पेन्शन मिळते सदर योजना ही संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना आहे. यामध्ये बसणाऱ्या व्यक्तींना सदर योजना लागू होते. तसेच ६० वर्षाच्या पुढील व्यक्तींना ज्येष्ठ नागरिकांचा पास दिला जाणार आहे. त्यामध्ये त्यांना बस, रेल्वे प्रवासात सुट मिळेल आणि सरकारी दवाखान्यात मोफत उपचार मिळतील, तसेच १८ ते ६० वयोगटातील श्रमिक कामगार व्यक्तींना केंद्र शासन उपक्रम असलेले ई श्रम कार्ड काढून देण्यात येणार आहे.

या शिबिराच्या कार्यक्रमाला मंडलअधिकारी,तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक, सरपंच,पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम विलास नागवडे (संस्थापक अध्यक्ष सुवर्णकन्या फाउंडेशन,) वैभव भागवत (संचालक,आपले सरकार सेवा केंद्र कासूर्डी ) मयूरआबा सोळसकर (जिल्हा युवक अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ) यांनी आयोजित केलेला आहे.

Previous articleराज्यात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निर्णय
Next articleइनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी प्रीती शहा