महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल त़ंत्रज्ञानावर आधारीत असलेल्या शैक्षणिक मासिकाच्या अंकाचे प्रकाशन

अमोल भोसले,उरुळी कांचन प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिक्षण आणि तंत्रज्ञान या विषयासाठी वाहिलेले महाराष्ट्रातील पहिले तंत्रज्ञान आधारित डिजिटल शैक्षणिक मासिक EDU तंत्र च्या प्रथम अंकाचा प्रकाशन सोहळा हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कविता वालझाडे यांच्या हस्ते पार पडला.

शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमावर त्यांच्या यशोगाथेवर, आणी आलेले यश यावर प्रकाश टाकला जातो, पण ते उपक्रम राबविताना आलेल्या अडचणी व त्यावर मात करताना अवलंबलेला मार्ग याची फारशी चर्चा होत नाही जे मुळात आवश्यक आहे. परंतू याद्वारे त्या वाटेवर जाणाऱ्या प्रत्येकाला पुढे येणाऱ्या खाचखळग्यांवर मात करता येईल. व इतर शिक्षकांच्या यशोगाथेतून फक्त प्रेरणा न मिळता मार्गदर्शन मिळावे या मुख्य हेतूने हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी काळभोर येथील शिक्षकांनी या मासिकाची निर्मिती केली आहे. सदरमासिक Edutantramagazine.blogspot.com या वेबसाइटवर जाऊन आपण डाउनलोड करू शकतो.

या प्रकाशन सोहळ्यास मासिकाचे मुख्य संपादक उमेध धावारे तसेच कार्यकारी संपादक पृथ्वीराज काळे, सुनील जाधव, सागर शिंदे, गणेश शिंदे तसेच या मासिकाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा मोलाचा हातभार लाभला असे प्रवीण भवाळ, महेश पवार, देविदास शिंदे, दिगंबर सुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हवेली तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी सुरू केलेला हा ज्ञानयज्ञ शतकानुशतके चालत राहावा वृद्धिंगत व्हावा आणि याचा महाराष्ट्राच्या गुणवत्ता विकासासाठी उपयोग व्हावा असे मत गटशिक्षणाधिकारी वालझाडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Previous articleरोजगार हमी मजूर ते चित्रपट,मालिका निर्माता, अभिनेता सचिन शिंदे या ध्येयवेड्या तरूणाचे स्वप्न साकार
Next articleदौंड पोलीस स्टेशनला ISO A+ग्रेड मानांकन