रोजगार हमी मजूर ते चित्रपट,मालिका निर्माता, अभिनेता सचिन शिंदे या ध्येयवेड्या तरूणाचे स्वप्न साकार

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

25 वर्षांपूर्वी रोजगार हमी वरती काम करत असताना,सर्वसामान्य तरुणाने चित्रपट, मालिक मध्ये काम करण्याचे स्वप्न पाहिले होते,जिद्द, चिकाटी,मेकष्ट करण्याची ताकद नि स्वतः वरती असणाऱ्या आत्मविश्वासमुळे आज या तरुणाचे स्वप्न साकार होत आहे,सचिन शिंदे हे त्या ध्येयवेड्या तरुणाचे नावं, खडकी ता.दौंड येथिल रहिवाशी आहे,

सुमंगलम प्रोडक्शन निर्मित,”चुलबुल चाची” या विनोदी मालिकेची निर्मिती करण्यात येत आहे,17 ऑगस्ट पासून अंजन टिव्ही वरती ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता ही मालिका प्रदर्शित करण्यात येत आहे, या मालिकेचे निर्माते सचिन शिंदे व सुश्मिता ओहळ लोंढे हे आहेत,तर दिग्दर्शक अशोक यादव आहेत.

या विनोदी मालिकेत विनोदी भूमिका आण्णा नावाची सचिन शिंदे यांनी साकारली आहे, अत्यंत विनोदी, सामाजिक परिवर्तनाची कास धरणारी ही मालिका सचिन शिंदे यांच्या स्वप्नातुन साकारत आहे

गरीब कुटुंबातील हा तरुण,आई-वडिलांचे छत्र लवकरच हरपलेले,घरची जबाबदारी स्वतः च्या खांद्यावर त्यामुळे या तरुणाने रोजगार हमी वरती काम करण्यास सुरुवात केली,गावात भेटेल ते काम करत-करत शिक्षण पुर्ण केले, आई कॅन्सर सारख्या रोगाने गेल्याने ही परिस्थिती दुसऱ्या वरती येऊ नये म्हणून आई च्या प्रित्यर्थ आधार फाउंडेशन ची निर्मिती केली, त्यातून गावोगावी रक्तदान शिबिर,आरोग्य शिबीर राबवून सुमारे 7500 छोटीमोठी ऑपरेशन केली,रुग्णालयात बिल कमी करणे,आरोग्य विमा मिळवून देणे,मोफत उपचार करणे अशी सामाजिक बांधिलकी जोपासत, रियल इस्टेट मध्ये सुरुवात केली नि त्यातून आलेल्या पैशातुन सामाजिक,सर्वसामान्य लोकांच्या गरजा भागविण्यासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न केले, संपूर्ण महाराष्ट्रात “आई” या विषयावरती व्याख्याने देऊन समाज परिवर्तन घडवण्याचे काम केली नि आता 25 वर्षे पूर्वी पाहिलेले चित्रपट निर्मिता, दिग्दर्शक,अभिनेता चे स्वप्न साकार करण्यासाठी चुलबुल चाची या विनोदी मालिकेतून अण्णांच्या भूमिकेतून एन्ट्री केली आहे, लवकरच त्यांच्या ग्रामीण भागातील संस्कृती चे रंग असणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे
ग्रामीण भागातील या ध्येयवादी तरुणास सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहे तर त्याच्या खडतर जीवनप्रवासाचे कौतुक केले जात आहे, यावर एकच म्हणावेसे वाटते,भगवान के पास देर है!लेकीन अंधेरा नहीं!,

जाहिरात