पुणे पोलीस परिमंडळ ३ च्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन

Ad 1

अमोल ठाकर ,खडकवासला प्रतिनिधी

कोरोनामुळे सतत चार महिने ड्युटी करून पोलीस बांधव व विशेष पोलीस अधिकारी थकलेले होते. त्यासाठी आज त्यांनी पोलीस परिमंडळ ३ च्या वतीने सायकल रॅली म्हणजेच सायक्लोथाॅनचे आयोजन करण्यात आले होते.

ही रॅली सकाळी १०वाजता उंबर्या गणपती चौक धायरी येथून सुरू होऊन सिंहगड रोड पोलीस स्टेशनला संपली. ह्या रॅलीमध्ये भाग घेणार्या विशेष पोलीस अधिकार्यांनी डी एस पी पौर्णिमा गायकवाड, पी आय नंदकिशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पाडली. यामध्ये सिंहगड रोड विशेष पोलीस अधिकार्यांनी उत्साहात भाग घेतला होता.