वळणवाट फाऊंडेशनच्या वतीने शिवे गावात कातकरी समाजाला आरोग्य किट वाटप

बाबाजी पवळे,राजगुरूनगर-स्वातंत्र्य दिनानिमित्त पश्चिम पट्टयातील खेड तालुक्यातील शिवे गावामध्ये वळणवाट फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी वस्तीवर गरजू लोकांना आरोग्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सदस्य चांगदेव शिवेकर,सरपंच सौ.आशाताई साकोरे,रामगीर बाबा ढोल मंडळ अध्यक्ष मा.तुकाराम शिवेकर,पैलवान जयराम खेंगले,भाजपा बुथ अध्यक्ष शिवे,नवनाथ शिवेकर, सत्यवान खेंगले,अक्षय शिवेकर, आनंद साकोरे,अनिल वाघमारे, युवा कार्यकर्ते राजेंद्र गडदे, साक्षील शिवेकर वळणवाट टीम तर्फे समीर पाटील,अमित बोंबले, रामदास देवकर,आदेश डोके अश्विनी मोरे व अमजद खान हे मान्यवर उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमात कातकरी वस्तीवर सुमारे ३५ कुटुंबातील लोकांना महिला साठी सँनिटर पँड,डेटाँल साबण,कोलगेट,ब्रश, मेडिक्लोअर इत्यादी साहित्याचे किटचे वाटप केले.कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान शिवे यांचे विशेष सहकार्य लाभले.रामदास देवकर यांनी मार्गदर्शन पर आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन मयूर मोरे यांनी केले तर आभार अक्षय शिवेकर यांनी मानले.

Previous articleप्रमोद परदेशी यांची नमो ग्रुप फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी फेरनिवड
Next articleछत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष  – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी