राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत  सुवर्णपदक पटकावणाऱ्या धनंजय मदने यांचा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सन्मान

उरुळी कांचन

केरळ (थिरुवनंतपुरम) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या वतीने खेळत असलेले उरुळी कांचन मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना ४०० मीटर धावणे हर्डल्स या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, ११० मीटर धावणे रौप्य पदक व ४ × १०० मीटर रिले रौप्य पदक, ३००० मीटर स्टीपलचेज ब्राँझपदक अशी ४ पदके प्राप्त केली. केरळ राज्य क्रीडामंत्री श्री.व्ही अब्दुरहिमन, भारतीय मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव विनोद कुमार हस्ते मेडल प्रदान करण्यात आलं.

स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतामधून १३ राज्य आले होते व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला चॅम्पियनशीप मिळाली महाराष्ट्राचे सचिव बाळू चव्हाण ही उपस्थित होते. तसेच मदने यांची जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आमदार अशोक पवार यांनी धनंजय मदने यांच्या स्वागत केले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, ओबीसीचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुभाष टिळेकर सह अनेकांनी स्वागत केले.

Previous articleउरुळी कांचन येथे ३० वर्षांनी भरली १० वीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा
Next articleट्रान्सफॉर्मर चोरणारी टोळी जेरबंद