अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची दौंड तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी

कुरकुंभ: सुरेश बागल

जळगाव जिल्ह्यातील (ता. तालुका) पाचोरा कळमसरा गावातील १३ वर्षाच्या दलित (चर्मकार) समाजाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करावी. असा इशारा पुणे जिल्हा व दौंड तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने दिलेला आहे. याबाबतचे निवेदन दौंड तहसीलदार संजय पाटील यांना तक्रारी बाबत निवेदन देण्यात आले. अशी माहिती राष्ट्रीय महासंघाचे जिल्हाध्यक्ष गोरख सोनवणे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना जळगाव जिल्ह्यातील कळमसरा गावातील १३ वर्षे वयाच्या अल्पवयीन दलित चर्मकार समाजाच्या मुलीला उचलून घेऊन गेले. तिच्यावर ९ ते १० नराधमांनी सामूहिक बलात्कार करून अत्याचार केल्याची घटना १४ मे २०२२ रोजी उघडकीस आली आहे.

सदर मुलगी (दि.१)० रोजी आपल्या मैत्रिणीसोबत रात्री नऊ वाजता बोलत उभी होती. त्यानंतर तिला गायब करण्यात आले ज्या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अत्याचार केला तिला पहाटे ०३:०० वा. महिलांच्या सार्वजनिक शौचालया जवळ सोडून पळून गेले. त्या ठिकाणाहून ती मुलगी घरी आल्यावर सदर घडलेल्या घटनेचा प्रकार उघडकीस आला. ही घटना अतिशय धक्कादायक असून, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केलेली आहे. या घटनेविषयी आता राष्ट्रीय चर्मकार महासंघ गप्प बसणार नाही याची नोंद प्रशासन व संबंधित पोलीस ठाणे यांनी घ्यावी.राष्ट्रीय चर्मकार महासंघ या घटनेचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेतील सर्व आरोपींना त्वरित अटक करून सदर खटला कोर्टात फास्टट्रॅकवर घेऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.

यासंदर्भात पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. अन्यथा राष्ट्रीय चर्मकार महासंघ रस्त्यावर उतरून आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही . याची नोंद प्रशासन व पोलीस विभागाने घ्यावी असे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या निवेदन मध्ये नमूद केलेले आहे.

यासंबंधीचे निवेदन स्विकारताना दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देताना दौंड तालुका चर्मकार महासंघाचे अध्यक्ष सितारामदादा वेताळ , दक्षिण जिल्हाध्यक्ष गोरखजी सोनवणे, दौंड कार्याध्यक्ष कैलासराव काळे, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, उपाध्यक्ष रामभाऊमामा अडसूळ, युवक उपाध्यक्ष ललित कदम, आकाश कदम, भाऊसाहेब माकर तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

Previous articleजमिनीतून गुप्तधन काढून देतो असे सांगून भामट्याकडून महिलेची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणुक
Next articleनारायणगावातील पत्रकारांच्या हस्ते साई मंदिराच्या महाद्वाराचे पूजन व महाआरती