जमिनीतून गुप्तधन काढून देतो असे सांगून भामट्याकडून महिलेची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणुक

नारायणगाव : किरण वाजगे

जमिनीतून गुप्तधन काढून देतो असे सांगून वारूळवाडी (ता.जुन्नर) येथील महिलेची मागील काही दिवसांमध्ये ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आळे (ता. जुन्नर) येथील भोंदूबाबा वर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी निर्मला रमेश नारायणकर (वय-५१, रा. वारूळवाडी, ता.जुन्नर) या महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार (वय ४२ ,राहणार साईव्हिला अपार्टमेंट, पाचवा मजला, रूम नंबर ५०२, आळे, ता. जुन्नर) याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार यांची व महिलेची ओळख काही दिवसांपूर्वी झाली होती. आरोपीने मी मांत्रिक बाबा असून माझ्याकडे अदृश्य शक्ती आहेत. त्याद्वारे सर्व घरगुती अडचणी सोडवून घरामध्ये शांतता व वैभव नांदेल अशी उपायोजना करतो. याशिवाय जमिनीतून धन काढून देतो अशी बतावणी करून यासाठी खर्च म्हणून आरोपीने निर्मला नारायणकर यांच्याकडून वेळोवेळी एकूण ९ लाख २५ हजार रुपयांची रक्कम घेतली.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर निर्मला नारायणकर यांनी भोंदूबाबा अब्दुल सलाम अब्दुल कासिम इनामदार यांच्याकडे घेतलेले पैसे मागितले मात्र त्यांने पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मागितले तर जीवे ठार मारण्याची व घराला आग लावून पेटवून देण्याची धमकी भोंदूबाबा इनामदार यांनी महिलेला दिली होती. भोंदूबाबाच्या दमबाजीला व दहशतीला कंटाळून शेवटी नारायणकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Previous articleशंभो प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धेत निलेश भिंताडे स्पोर्ट्स कल्बने प्रथम क्रमांक पटकावला
Next articleअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची दौंड तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी