सावरदरी ग्रामपंचायतच्यावतीने बौद्ध पौर्णिमे निमित्त प्रतिमेचे पूजन

चाकण – सावरदरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून बौद्ध पौर्णिमाचे अवचित्त साधून गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व दलित बांधवांना घरगुती उपयोगी पिठाची गिरण ग्रामपंचायतच्या १५% माध्यमातून वाटप करण्यात आल्या,आमच्या सावरदरी गावात वार्ड क्रमांक. ०३ मध्ये सोनवणे वस्ती असून त्या मध्ये जवळपास १५ कुटुंब आहेत प्रत्येकाला गिरण देण्यात आली आहे आणि यांना प्रत्येक गोष्टीचा लाभ मिळावा म्हणून सरपंच भरत तरस व उपसरपंच श्री संदिप पवार हे नेहमी पाठपुरावा करत असतात यांच सोनवणे वस्ती वर अतिशय उत्तम पद्धतीने समाज मंदिर उभारण्यात आले आहे.

या मध्ये वॉल कंपाउंड गार्डन पार्किंग ची सुख सुविधा उपलब्ध आहे या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे,

वाटप करतांना उपस्थित मान्यवर सरपंच भरत तरस ,मा.उपसरपंच श्री संदिप बाळासाहेब पवार ,ग्रामसेवक श्री श्रीधर नाईकडे ,संतोष शिंदे सर ,गणपत साकोरे, बाळासाहेब पवार ,बाळु साकोरे ,संभाजी शेटे, भगवंत शिंदे, विष्णू हंबीर, आप्पा शेटे, करण शेटे,मिथुन शिंदे, आप्पा गाडे, बाळा पवार, सर्व सोनवणे परिवार समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleसावरदरी ग्रामपंचायतच्या गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन
Next articleसावरदरी ग्रामपंचायतच्यावतीने गौतम बुध्दांच्या प्रतिमेचे पूजन