राजगुरुनगर मध्ये हुतात्मा सुखदेव जयंती साजरी

राजगुरुनगर
शहीद सुखदेव थापर यांची ११५ वी जयंती आज राजगुरुनगर येथे साजरी करण्यात आली.बसस्थानक परिसरात असलेल्या हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव स्मृती स्थळ येथे असणाऱ्या हुतात्मा सुखदेव , भगतसिंग ,सुखदेव यांच्या शिल्पास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य,हुतात्मा राजगुरू स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख ,स्व.सुरेश गोरे प्रतिष्ठान चे राहुल गोरे, राजगुरुनगर बँक माजी अध्यक्ष गणेश थीगळे,बबन होले भामा आसखेड धारण समिती अध्यक्ष देविदास बांदल,खेड बार असोसिएशन अध्यक्ष ad. गोरडे, हुतात्मा राजगुरू स्मारक समिती सदस्य श्रीराम खेडकर,हुतात्मा राजगुरू मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल पाचारने,हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव न्यास अध्यक्ष मधुकर गिलबिले, एक क्षण हुतात्म्यांसाठीचे अजिंक्य बकरे,प्रवीण गायकवाड,हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन संस्थापक कैलास दुधाळे ,भा. ज. प.राजगुरुनगर शहर अध्यक्ष दीप्ती ताई कुलकर्णी,तसेच मनीषा कुलकर्णी, मालती भगत, नितीन शहा,बबन होले,दिलीप होले,आदी उपस्थित होते.

हुतात्मा राजगुरू जन्म स्थळ राष्ट्रीय स्मारक येथे हुतात्मा सुखदेव यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालण्यात आला.यावेळी हुतात्मा राजगुरू स्मारक समिती अध्यक्ष अतुल देशमुख ,सचिव सुशील मांजरे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मधुकर गिलबिले गुरुजी यांनी प्रास्ताविक केले.अजिंक्य बकरे यांनी शहीद सुखदेव यांच्या कार्यबद्दल विचार मांडले.राहुल गोरे,ad. गोरडे,अतुल देशमुख यांनी विचार मांडले.हुतात्मा राजगुरू मेमोरियल ट्रस्ट च्या वतीने अल्पोपहार ठेवण्यात आला होता..राष्ट्रगीताने कार्यक्रम सांगता झाली.

Previous articleराजमाता महिला गृपच्या वतीने कवठे येमाई येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
Next articleकंटेनरची दुचाकीला धडक : दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू