राजमाता महिला गृपच्या वतीने कवठे येमाई येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

कवठे येमाई (प्रतिनीधी-धनंजय साळवे) –  राजमाता महिला गृपच्या वतीने कवठे येमाई येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.धर्मासाठी बलिदान देणारे जगात एकमेव असणारे राजे छत्रपती संभाजी.. त्यांची जयंती 14 मे रोजी सर्वत्र साजरी करण्यात येते.अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख केला आहे.
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥
अर्थ-कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास तारुण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास .याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले.महाराष्ट्राचे आराध्य असणाऱ्या देवाचे चिरंजीव,ज्यांना शिवरायांचा छावा म्हणून देखील संबोधल जातं असे युगधुरंदर महाराज म्हणजेच छत्रपती संभाजी राजे भोसले होय.


अशा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कवठे येमाई येथे राजमाता महिला गृपच्या वतीने कवठे येमाई साजरी साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन ह्या प्रसंगी करण्यात आले.त्यांच्या ज्वलंत जाज्वल ईतिहासाचे स्मरण करण्यात आले ह्या प्रसंगी राजमाता महिला गृपच्या अध्यक्षा अध्यक्ष वैशालीताई रत्नपारखी, रंजना कुंभार, अश्विनी धर्माधिकारी, रेखा कांदळकर, राणी जाधव, लक्ष्मी भंडारी, अलका कुंभार, अश्विनी गायकवाड, कमल दहितुले, छाया येडे,प्रमिला गायकवाड ह्या भगिनी उपस्थित होत्या.तसेच या प्रसंगी बहुचर्चित गुल्हर चित्रपटाचे लेखक मोहन पडवळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Previous articleछत्रपती संभाजी महाराज जयंती व एस.एम.देशमुख यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा
Next articleराजगुरुनगर मध्ये हुतात्मा सुखदेव जयंती साजरी