छत्रपती संभाजी महाराज जयंती व एस.एम.देशमुख यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा

गणेश सातव ,वाघोली

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस. एम.देशमुख यांचा वाढदिवस पुर्व हवेलीतील बकोरी गावच्या हद्दीतील ‘बकोरी हिल्स्’ या ठिकाणी देशी पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हवेली तालुका पत्रकार संघ,हवेली तालुका सोशल मिडिया परिषद, माहिती सेवा समिती व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बकोरी हिल्स् या डोंगर पायथ्यालगत वड,उंबर,पिंपळ, कांचन, शिसम,लिंब,जांभुळ आदी स्थानिक पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनीलनाना जगताप,पत्रकार हल्ला कृती समितीचे जिल्हा निमंत्रक के.डी.गव्हाणे,उपाध्यक्ष सुनील भांडवलकर,हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र बापू काळभोर,पुणे जिल्हा सोशल मिडिया परिषद अध्यक्ष जनार्दन दांडगे,माहिती सेवा समितीचे संस्थापक चंद्रकांत वारघडे,माहिती सेवा वृक्ष संवर्धन समिती शिरुर तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे,माहिती सेवा समिती हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट,वनरक्षक बी.एस. वायकर,पत्रकार जितेंद्र आव्हाळे,अमोल भोसले,गणेश सातव आदी उपस्थित होते.

बकोरी हिल्स् या ठिकाणी माहिती सेवा समिती व विविध संस्थांच्या माध्यमातून २०१७ पासून आतापर्यंत जवळपास २५ हजार देशी पर्यावरण पूरक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.या वाढलेल्या वृक्षराजीमुळे पावसाळ्यात अत्यंत देखणं स्वरूप या ठिकाणी अनुभवायला मिळते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सातव यांनी केले,तर आभार राजेंद्र बापू काळभोर यांनी मानले.

देशी पर्यावरणपुरक, स्थानिक वृक्षांची लागवड करणे हि काळाची गरज आहे.अलीकडे तापमान खुप वाढले आहे.पर्जन्यमान हि कमी कमी होत चालले आहे.आज मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा होत आहे.हि आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची व कौतुकाची बाब आहे.राज्यातील तमाम पत्रकार बांधवांना हि आवाहन करण्यात येत आहे कि, आप- आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात,गावात अश्या विविध उपक्रमाद्वारे वृक्षारोपण करावे. निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता टिकली,त्याचे योग्य संवर्धन झाले तरचं आपल्या पुढच्या पिढ्या सुखानं जगतील.

शरद पाबळे ,कार्याध्यक्ष -अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,मुंबई.

Previous articleकृषी विभागाच्या खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण वर्गात जमीनीचे आरोग्य व जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
Next articleराजमाता महिला गृपच्या वतीने कवठे येमाई येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी