कृषी विभागाच्या खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण वर्गात जमीनीचे आरोग्य व जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

उरुळी कांचन

आळंदी म्हातोबाची (ता.हवेली) येथे महाराष्ट्र शासन कृषि कृषी विभागाच्या खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण वर्गात जमीनीचे आरोग्य व जमीनीची सुपिकता टिकवून ठेवण्याचे शेतकऱ्यांना आवाह मार्फत पुणे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, पुणे उपविभागीय कृषि अधिकारी सुनिल खैरनार, हवेली तालुका कृषि अधिकारी मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर मंडळ कृषि अधिकारी गुलाबराव कडलग यांच्या वतीने खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षण वर्गात सिद्धेश्वर अवचर कृषि सेवक आळंदी म्हातोबाची यांनी शेतकरी प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रचे प्रास्ताविक करुन खरीप हंगाम पुर्व तयारी करताना शेतकऱ्यांनी जमीनीची निवड, बियाणे वाणांची निवड, पेरणीची वेळ, पेरणीची पद्धत या बाबींचा प्राधान्याने विचार करावा तसेच बियाणे उगवण क्षमता चाचणी, बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक राबविण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड गांडुळ खत प्रकल्प, नाडेप खत प्रकल्प, विहीर पुनर्भरण लाभार्थी निवड , संमती, कामाची पद्धत व अनुदान वाटप, वेस्ट डिकंपोजर कल्चर बाबत उपस्थितांना माहिती दिली
हडपसर-१ कृषि पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर यांनी खरीप हंगाम पुर्व तयारी शेतकरी प्रशिक्षण वर्गात जमीन, हवामान, पाणी, जमीनीचे घटक, जमीनीचे आरोग्य, जमीन सुपिकता, जमीनीतील सेंद्रिय कर्ब‌‌‌ पातळी , जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, जमीनीमधील हवा व पाणी यांचे महत्त्व, जिवाणू संवर्धक खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा अवलंब, हिरवळीचे खत साठी ताग, धेंचा, चवळी, मुग, उडीद पिकांची पेरणी करणे, पिकांची फेरपालट, कंपोस्ट खत, गांडुळखत, शेणखत, जिवामृत, गोकृपाअमृत, वेस्ट डिकंपोजर कल्चर, दशपर्णी अर्क, निम अर्क, निम/करंज तेल चा वापर करणे. पिकांवरील किड रोग नियंत्रण ठेवण्यासाठी चिकट सापळे, पक्षी थांबे, प्रकाश सापळे, जैविक निविष्ठांचा अवलंब करणे.

मशागतीय पद्धतीमध्ये खरीप हंगाम पुर्व जमीनीची नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन उन्हात तापु देणे व शेवटच्या कुळवाच्या पाळी पुर्वी जमीनीत सेंद्रिय खतांचा वापर करावा व पाऊस पडल्यानंतर बिजप्रक्रिया करुनच बियाणे व रासायनिक खतांची पेरणी दोन चाडी पाभरीने किंवा बीबीएफ यंत्राद्वारे करणेबाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.

तसेच महाडीबीटी पोर्टल वरील कृषि यांत्रिकीकरण योजना अंतर्गत कृषि औजारे, प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना अंतर्गत ठिबक सिंचन तुषार सिंचन संच,इलेक्ट्रिक मोटार,डिझेल इंजिन, फवारणी पंप, पाॅली हाऊस, शेडनेट हाऊस,मल्चींग, शेततळे अस्तरीकरण,कृषि औजारे बॅक, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड गांडुळ खत प्रकल्प, नाडेप खत प्रकल्प, विहीर पुनर्भरण, बाजरी पिक प्रात्यक्षिक प्रकल्प, मुग पिक प्रात्यक्षिके, आत्मा योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, शेतकरी सहल, विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री, स्मार्ट‌‌‌ प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, कृषि निर्यात साठी अपेडा संकेतस्थळावर नोंदणी करणे, जैविक शेती अभियान बाबत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

शेतकरी प्रशिक्षण वर्ग व प्रश्र्नोत्तरांच्या चर्चासत्रानंतर क्षेत्रिय भेटीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विजय जवळकर यांनी नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या केशर आंबा बागेतील फळांना लावलेल्या कागदी बॅगिंग ची पाहणी करुन मार्गदर्शन केले. तसेच विहीर पुनर्भरण साठी निवड केलेल्या शेतकऱ्यांच्या विहीरींची पाहणी करुन कामाची आखणी व काम करण्याची पद्धत, अनुदान वाटप बाबत संबंधीत शेतकरी यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास सरपंच सोनाली जवळकर, तुषार जवळकर, ग्रामपंचायत सदस्य, दयानंद शिवरकर, प्रगतशील शेतकरी शिवाजी खंडेराव जवळकर, विजय जवळकर, लक्ष्मण खटाटे, विनायक जवळकर, अशोक नाना शिंदे, कुणाल जवळकर व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेलच्या शहरध्यापदी धनराज टिळेकर तर किसान सेलच्या शहराध्यपदी रोहिदास मुरकुटे यांची निवड
Next articleछत्रपती संभाजी महाराज जयंती व एस.एम.देशमुख यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा