बाबा हरदेव सिंह जी महाराज यांना समर्पित – समर्पण दिवस

पुणे – युगद्रष्टा बाबा हरदेवसिंह जी महाराज यांचा सर्वप्रिय दिव्य स्वभाव व त्यांचे अलौकिक विचार मानव कल्याणार्थ समर्पित होते. त्यांनी पूर्ण समर्पण, सहनशीलता आणि विशालतेच्या भावनांनी युक्त होऊन ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून सत्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचविला आणि विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेला वास्तविक रूप प्रदान केले.

बाबा हरदेवसिंहजी यांनी ३६ वर्षे सत्गुरू रूपात निरंकारी मिशनची धुरा सांभाळली. आध्यात्मिक जागृतीबरोबरच त्यांनी समाजकल्याणाच्या अनेक कार्यांना निश्चित स्वरूपाची रूपरेषा देऊन गतिमान केले. त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान, रक्तपेढीची निर्मिती, नेत्रचिकित्सा शिबिरे, वृक्षारोपण अभियान, स्वच्छता अभियान इत्यादि कल्याणकारी कार्यांचा समावेश आहे. एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी महिला सशक्तिकरण तसेच तरुणांच्या ऊर्जेला नवी दिशा व परिमाण देण्यासाठीदेखील बाबाजींनी कित्येक परियोजना कृतीत उतरविण्यासाठी आपले दिव्य मार्गदर्शन आणि आशीर्वाद प्रदान केले. या शिवाय नैसर्गिक आपत्तींच्या वेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिशनकडून सातत्याने सेवा कार्य करण्यात आले.

बाबाजींनी मानवतेचे दिव्य स्वरूप साकार करण्यासाठी निरंकारी संत समागमागमांची अविरत शृंखला पुढे नेली ज्यामध्ये सर्वांना ज्ञानरुपी धाग्यामध्ये गुंफून प्रेम, नम्रता यांसारख्या दिव्य गुणांनी परिपूर्ण केले. ‘मानवता हाच माझा धर्म होय’ हे कथन सार्थक करत संत निरंकारी मिशनची शिकवण त्यांनी लहान-सहान वस्त्यांपासून ते विदेशापर्यंत विस्तृतपणे पसरविली. त्यांनी हेच समजावले, की भक्तीचा प्रवाह निरंतर आपल्या जीवनात वाहत राहायला हवा.

बाबा हरदेवसिंहजी यांना मानवमात्राच्या सेवेमध्ये आपले उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल देश-विदेशात सम्मानितदेखील करण्यात आले. २७ यूरोपीय देशांच्या संसदेने त्यांना विशेष रूपात सन्मानित केले. त्यांनी मिशनला संयुक्त राष्ट्रांचे (U.N.) चे मुख्य सल्लागार बनविले. याबरोबरच जगामध्ये शांती स्थापित करण्याच्या त्यांच्या यशस्वी प्रयत्नांसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मानित करण्यात आले.

सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज, बाबा हरदेवसिंह जी यांच्या शिकवणूकीचा उल्लेख करताना सांगतात, की बाबाजींनी आपले संपूर्ण जीवन मानवकल्याणासाठी समर्पित केले. ३६ वर्षे मिशनचे नेतृत्व करत त्यांनी प्रत्येक भक्ताला मानवतेची शिकवण देऊन त्यांच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त केला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सदोदित सर्वशक्तिमान निरंकार प्रभुच्या इच्छेवर विश्वास ठेवण्यावर त्यांनी भर दिला. सद्गुरु माताजी नेहमी सांगतात, की आपण आपल्या आचरणातून एक यथार्थ मनुष्य होऊन क्षणोक्षणी समर्पित भावाने आपले जीवन जगावे. हेच बाबाजींच्या प्रती खऱ्या अर्थने आमचे सर्वात मोठे समर्पण असेल आणि त्यांच्या शिकवणूकीवर चालून आपण त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करु शकतो.

मानव कल्याणाच्या प्रति समर्पित सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज आयुष्यभर आध्यात्मिक मार्गदर्शकाच्या रूपात मानवमात्राला सत्याचा मार्ग दाखवत राहिले. वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज सकारात्मक स्वरूप देत हा दृष्टिकोण नवऊर्जा व तन्मयतेने पुढे घेऊन जात आहेत.

सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या दिव्य उपस्थितित ‘समर्पण दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन एका विशाल निरंकारी संत समागमाच्या रूपात शुक्रवार, दि. १३ मे रोजी वेळात संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा (हरियाणा) येथे करण्यात आले होते.

असेच संत समागम संपूर्ण देशासह विदेशातही आयोजित केले जात असून त्यामध्ये मोठ्या संख्येने निरंकारी भक्तगण एकत्रित होऊन बाबा हरदेवसिंहजी यांचे स्मरण करुन त्यांच्या जीवनातून व शिकवणूकीतून प्रेरणा घेतील. बाबाजींनी दर्शविलेल्या सत्याच्या मार्गावर समर्पित राहून चालत राहण्याचा पुनश्च संकल्प करतील.

समर्पण दिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्यातील घोडेगाव व नारायणगाव येथे विशेष निरंकारी सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

वर्तमान काळात सर्वत्र वैर, ईर्षा, द्वेषाचे वातावरण व्याप्त आहे. मनुष्य एकमेकांचे अहित करण्यामध्ये गुंतला आहे.

अशा परिस्थितीत बाबा हरदेवसिंहजी यांचे प्रेरणादायक संदेश – ‘काहीही बना मुबारक आहे, पण आधी मनुष्य बना’; ‘भिंती विरहित जग’; एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा; जीवनात धारण करण्याची गरज आहे. तेव्हाच जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.

Previous articleनारायणगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
Next articleकायद्याचा आदर करणार नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करू- एपीआय किरण भालेकर