नारायणगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नारायणगाव : किरण वाजगे

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील शंभूवंश प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सकाळी साडेनऊ वाजता प्रतिष्ठानच्या नामफलकाचे पूजन करण्यात आले त्यानंतर सकाळी दहा वाजता हनुमान चौक नारायणगाव येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चिम वेशीवरील मूर्तीचे पूजन व दुग्धाभिषेक करण्यात आला. लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतिक जाधव यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून शंभूराजांना मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमाला माजी उपसरपंच संतोष वाजगे, नामदेव खैरे संतोष दांगट डॉक्टर विलास नायकोडी डॉक्टर पंजाबराव कथे, डॉक्टर संदीप डोळे, जुबेर शेख, अनिकेत पाटे, सुरज वाजगे, अक्षय खैरे, तसेच शंभूवंश प्रतिष्ठान व हिंदू गँगचे पदाधिकारी निनाद जोशी, मयुर भुजबळ, सुमित खैरे, उमेश साळी, प्रदीप गुळवे, ऋतिक जाधव, अजिनाथ बोराडे, सचिन वारुळे, अक्षय डोके, वैभव भवारी, प्रशांत बनकर, गणेश फापाळे, ओमकार भोर, विशाल केदारी, गौरेश बनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठान च्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही प्रतिमा नारायणगाव तसेच वारूळवाडी, हिवरे ग्रामपंचायत मध्ये ही देण्यात आली. नारायणगाव पोलिस स्थानकात उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना देखील छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देण्यात आली.

Previous articleश्री श्रीरविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगावात रक्तदान, मधुमेह व ज्येष्ठांसाठी मोफत शिबिरांचे आयोजन
Next articleबाबा हरदेव सिंह जी महाराज यांना समर्पित – समर्पण दिवस