श्री श्रीरविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगावात रक्तदान, मधुमेह व ज्येष्ठांसाठी मोफत शिबिरांचे आयोजन

नारायणगाव : ( किरण वाजगे )

आर्ट ऑफ लिविंग परिवार जुन्नर, आंबेगाव आणि खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक व जागतिक कीर्तीचे अध्यात्मिक गुरू श्री.श्री.रविशंकरजी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि १३ मे २०२२ रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत नारायणगाव येथे भव्य रक्तदान, मधुमेह,आणि ज्येष्ठांसाठी मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सिनिअर टिचर तुषार देवकर यांच्या हस्ते झाले. कोरोना महामारीच्या काळात रक्तपुरवठा कमी पडल्यामुळे आर्ट ऑफ लिविंग च्या सर्व सेंटर मध्ये रक्त संचयन करण्याचा संकल्प केला आहे. डॉ मनोहर डोळे फाउंडेशन द्वारा मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. डायबेटिक प्राश वेलकेअर हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत मधुमेह तपासणी डॉ. प्रशांत शेलार यांनी केली. डॉ. प्रतीक पाटील मॅक्स केअर हॉस्पिटल नारायणगाव यांच्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी मूत्रविकार, अपेंडिक्स, पोस्टेट, हर्निया व आतड्यांचे विकार इत्यादी मोफत तपासणी केली गेली. सायंकाळी ६.३० ते ८.३० वाजता गुरुपूजा , सत्संग आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. नारायणगाव पंचक्रोशीतील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.या शिबिरात सर्व प्रशिक्षक व सर्व स्वयंसेवक यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Previous articleधर्मवीर संभाजी राजेंना नागफणी कड्यावरून मुजरा
Next articleनारायणगाव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी