धर्मवीर संभाजी राजेंना नागफणी कड्यावरून मुजरा

राजगुरूनगर

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सह्याद्री खोऱ्यातील आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा ३५० फुटी नागफणी कडा (ड्युक्स नोज, लोणावळा) सर करीत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भगवा स्वराज्य धव्ज हाती घेत संभाजी राजेंचा जयजयकार करीत मानाचा त्रिवार मुजरा केला.

या मोहिमेची सुरुवात लोणावळा नजिक कुरवंडे गाव, ता.मावळ, जि.पुणे येथून झाली. एक तासांची पायपीट करून एक धडकी भरवणारा ट्रॅवर्स मारून कड्याच्या पायथ्याला पोहोचता येते. आरोहाणासाठी ४ तास लागले.

हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते. पहिले ८५ अंशातील तीन टप्पे पार केल्यावर या मोहिमेतील सर्वाधिक कठीण असा क्रॅक आणि ओव्हरहँग चा ३० फुटी टप्पा गिर्यारोहकांची परीक्षा घेणारा आहे. त्यानंतर लूज रॉक्स चा टप्पा पार केल्यावर शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील ३०० फुटी सरळसोट कठीण चढाई, पाहता क्षणी मनात धडकी भरावी असे कड्याचे रांगडे रूप, ओव्हरहँगचा अंगावर येणारा कठीण टप्पा, उष्णतेची लाट अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सचे चेतन शिंदे, जॅकी साळुंके, पूजा साळुंके, अर्चना गडधे, रोहित पगारे, तेजस जाधव, सिद्धार्थ बाविस्कर, मंदार आव्हाड, ज्योती राक्षे-आवारी, ओंकार रौंधळ, अनुराग दांडेकर, पुरुषोत्तम राऊत, प्रशांत राऊत, प्रशील अंबाडे, प्रदीप बारी, राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक विजेती ध्रुवी हर्षदा गणेश पडवळ (वय ९ वर्षे) आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleपाटस टोलनाक्यावर गावठी दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक ; ४ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
Next articleश्री श्रीरविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगावात रक्तदान, मधुमेह व ज्येष्ठांसाठी मोफत शिबिरांचे आयोजन