एव्हिएन्स सायंटिफिक संस्थेमार्फत बीजेएस कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वाघोली येथे रिचार्जेबल एल इ डी बल्ब ची कार्यशाळा

कवठे येमाई (प्रती-धनंजय साळवे)-भारतीय जैन संघटनेच्या आर्टस्, सायन्स व कॉमर्स महाविद्यालयामध्ये रिचार्जेबल एल इ डी बल्ब ची नुकतीच कार्यशाळा पार पडली.यावेळी दिपप्रज्वलन डॉ.अविनाश रोकडे व प्रिंसीपल डॉ.अशोक गिरी यांनी केले. ही कार्यशाळा बीजेएस कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयासोबत एव्हिएन्स सायंटिफिक संस्थेने संयुक्तपणे आयोजित केली होती. हा उपक्रम नाविन्यपूर्ण शिक्षण, व्यवसाय स्टार्टअप कल्पना आणि विद्यार्थ्यांसाठी एलईडी लाइट बल्ब निर्मितीचे प्रशिक्षण यावर आधारित होता. या संस्थेने यापूर्वी जवळपास चारशे विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले असून, यामध्ये प्रामुख्याने ऊर्जा बचाव, पर्यावरणपूरक विकास आहे. कार्यशाळा आयोजित करण्याचा या संस्थेचा मुख्य उद्देश पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा निर्माण करणे आणि त्याचा योग्य वापर करणे हा आहे.

एव्हिएन्स सायंटिफिक संस्थेमार्फत सोसायट्यांना शाश्वत ऊर्जा भविष्याकडे जाण्यासाठी त्यांचे समर्थन करतो आणि सर्व प्रकारच्या नवीकरणीय ऊर्जेचा वापर, सर्वोत्तम पद्धती, हरित तंत्रज्ञान आणि नवकल्पना मजबूत करण्यासाठी माहिती देत असतात.
ऊर्जा सुरक्षा, कमी झालेले पारंपारिक स्त्रोत, ऊर्जेची मागणी आणि ऊर्जेच्या किमतीत वाढ या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अक्षय ऊर्जेद्वारे ऑफर केलेल्या अफाट संधींवर दृढ विश्वास ठेवून ही संस्था काम करते.

भविष्यात उर्जेचा प्रश्न हा गंभीर होणार आहे कोळशाच्या कमतरतेमुळे ईतर पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा निर्माण करणे गरजेचे आहेच शिवाय कमी साधनां मधून जास्तीत  जास्त ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे असे डॉ.अविनाश रोकडे यांनी सांगितले.   याप्रसंगी फिजिक्स डिपार्टमेंट हेड श्री.शिवाजी सोनवणे,इनचार्ज सायंस फॅकल्टि डॉ.आर.ए.गुललकरी,व्हाईसप्रिंसीपल डॉ. के.एस. देसरडा,प्रिंसीपल डॉ.अशोक गिरी हे उपस्थित होते.

Previous articleपेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस G S T च्या कक्षेत आणुन महागाई वर नियंत्रण आणा- भारतीय मजदूर संघाची मागणी
Next articleनारायणगावात लागोपाठ दुसऱ्या दिवशी खून