शिंदवणे सोसायटीतील १५ वर्षाची सत्ता आण्णा महाडिक गटाने टाकली उलथून

शिंदवणे- विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत शिंदवणे (ता.हवेली )गावचे माजी सरपंच आण्णा महाडिक गटांची सत्ता आली असुन गेली पंधरा वर्षे सोसायटी ज्यांच्या ताब्यात होती ती आपल्या कडे खेचून आणण्यात आण्णा महाडिक गटाला यश आले आहे. नुकतीच सोसायटीची पंचवार्षिक २०२२ ची निवडणूक झाली. विरोधी गटाने आण्णा महाडिक यांना पराभव करण्यासाठी जंगजंग पछाडुन अतिशय जबर व्युहरचना आखली होती ती व्युहरचना भेदून काढण्यात आण्णा महाडिक गट यशस्वी झाला. असल्याची चर्चा हवेली तालुक्यात सुरु असुन या विजयाने आण्णा महाडिक यांनी सहकारात दमदार प्रवेश केल्याचे दिसून येत आहे.

या निवडणुकीत विरोधी गटाकडे गेली १५ वर्षे असलेली सत्ता अतिशय चुरशीची लढत देत आण्णा महाडिक गटाने १२-१ असा दणदणीत विजय मिळवला. विरोधी गटाला आण्णा महाडिक गटाचा पराभव करण्यासाठी शेजारील गावातील पुढाऱ्यांनी सर्व रसद पुरविण्यात आली असल्याची चर्चा पुर्व हवेलीतील नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. एवढी मोठी रसद पुरवुन सुद्धा आण्णा महाडिक गटाचा विजय झाल्यामुळे शिंदवणे परिसरात आंनदाचे वातावरण आहे.

Previous articleथेऊर फाटा ते थेऊर रस्त्याच्या कामाला सुरुवात : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
Next articleराज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने प्रतिक गंगणे यांचा सन्मान