कोरोना महामारीमुळे गरजू कुटूंबांना रक्ताचा तुडवडा जाणवत असल्याने स्वातंत्र्यदिनानिमीत्त रक्तदान शिबीर

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

आपल्या भारताला स्वातंत्र्य खूप कष्टाने प्राप्त झालेले आहे. हे सदैव सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. ज्या थोर क्रांतिकारकांनी यात अमूल्य योगदान दिले आहे त्या सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त स्मरण करुया तसेच कोरोनाच्या या कठीण परस्थिती मध्ये पुढील काही काळ शासनाच्या वतीने सांगितल्याप्रमाणे आपण आपली योग्य ती काळजी घेऊ या असे प्रतिपादन शिंदवणे ग्रामपंचायतचे सरपंच आण्णासाहेब महाडिक यांनी व्यक्त केले. १५ आॅगस्ट ७४ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ड्रिम्स निवारा सोसायटी कोरेगावमूळ (ता.हवेली) येथे “भव्य रक्तदान शिबीराचे” आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरास जनतेने उत्तम प्रतीसाद देत ५१ लोकांनी स्वइच्छेने रक्तदान केले. रक्तदात्यास सॅनिटायझर , रोगप्रतिकार शक्तीच्या गोळ्या व प्रशंस्तीपत्र देउन सम्मानीत करण्यात आले.

रेड प्लस ब्लड बँक पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले. पोलीस मित्र संघ, ड्रिम्स निवारा कोरेगावमूळ, रमाई सेवा संघ ड्रिम्स निवारा, कोरेगावमूळ. वंचित बहुजन महिला आघाडी संघटना पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शिंदवणे ग्रामपंचायतचे सरपंच आण्णासाहेब महाडिक, कोरेगावमूळच्या सरपंच लता आनंदा चौधरी, उपसरपंच विट्ठल थोरात, पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर, वंचित बहुजन आघाडीचे पुर्व जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, पश्चीम जिल्हा अध्यक्ष उत्तम वनशीवे, प्रिया लोंढे, प्रशांती साळवे, कविता टोळे मनिषा कुंभार , मोना ननावरे,अर्चना वनपुरे, सरिका जगताप, संजय साळवे, शंकर अहीवले, रविंद्र गायकवाड, विष्णु कांबळे हे मान्यवर देखील उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन आरती मुन यांनी केले तर आभार प्रियांका जाधव यांनी केले.

आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, या लढ्यात सहभागी होण्यासाठी हजारो लोकांनी आपले घरदारही सोडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीर हा कार्यक्रम कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील पोलीस मित्र संघ, ड्रिम्स निवारा, रमाई सेवा संघ ड्रिम्स निवारा, वंचित बहुजन महिला आघाडी संघटना पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला असल्याने असे स्तुत्य उपक्रम भविष्यात राबविले पाहिजे असे मत हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी व्यक्त केले.

Previous articleकोरोना विरोधात लढा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायजर वाटप
Next articleआर. आर. आबांच्या आठवणी ताज्या-जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ — उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली