कोरोना विरोधात लढा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायजर वाटप

Ad 1

दिनेश पवार -दौंड(प्रतिनिधी)

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दिनांक 15 ऑगस्ट रोजी कोरोना विरोधात लढा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पंचायत समिती दौंड चे उपसभापती नितीन भाऊ दोरगे यांच्या माध्यमातून 5000 मास्क व 500 लिटर सॅनिटायजर दौंड चे तहसीलदार संजय पाटील व गट विकास अधिकारी गणेश मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, हे मास्क व सॅनिटायजर तालुक्यातील आरोग्य सेवक,कोविड सेंटर मधील रुग्ण व कर्मचारी, सर्वे करणारे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

तालुक्यातील कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहे,या अधिकारी व कर्मचारी यांनी जे सतत प्रयत्न करून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहे, त्यामुळे खरे हे योद्धे ठरले आहेत यांची काळजी घेण्यासाठी नितीन भाऊ दोरगे यांच्या माध्यमातून केलेले मास्क व सॅनिटायजर चे वाटप यामुळे या योध्दा ची उमेद वाढण्यास नक्कीच मदत होईल.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे, पंचायत समिती सभापती आशाताई शितोळे, उपसभापती नितीन भाऊ दोरगे,दौंड नगर परिषद चे नगरसेवक बादशहा भाई शेख, अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल भाई खान,पंचायत समिती सदस्य-सुशांत दादा दरेकर, प्रकाश बापू नवले,गणेश भाऊ कदम,नितीन दादा शितोळे,तालुका आरोग्य अधिकारी-डॉ. अशोक रासगे आदी मान्यवर उपस्थित होते.