धामणे शालेय इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न


चाकण – धामणे (ता.खेड) येथील शालेय इमारतीचे उद्घाटन उद्योग व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप मोहितेपाटील होते.
दोन वर्षापुर्वी निसर्ग चक्रिवादळात धामणे शाळेच्या इमारतीचे संपुर्ण छत उद्ध्वस्त झाले होते. तेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भेट देऊन भक्कम आरसीसी इमारत उभारण्याचे सूतोवाच केले होते.

धामणे ग्रामस्थांची भावना आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पुढाकार घेऊन साधारण ४५ लक्ष रुपयांच्या निधीमधून देखणी शालेय इमारत उभी राहिली.यावेळी तटकरे म्हणाल्या, “शासकिय निधी आणि आमदार मोहितेपाटलांच्या भरीव मदतीतून सुंदर इमारत उभी राहिली. लोकप्रतिनीधींसाठी मोहिते यांचे काम आदर्शवत आहे. यावेळी दिलीप मोहितेपाटील म्हणाले, “धामणे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिष्यवृत्ती परिक्षेच्या यशाची परंपरा आहे. भजन आणि कुस्तीमध्येही शाळेचे नाव आहे. या देखण्या इमारतीमुळे धामणे गावाच्या लौकिकात भर पडेल.”

या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, लता गोपाळे, पीएमआरडीएचे संचालक वसंत भसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, तहसिलदार डाॅ.वैशाली वाघमारे, गटविकासअधिकारी अजय जोशी, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, विस्ताराधिकारी सुनंदा शेवकरी, बांधकाम उपअभियंता जे.डी.कचरे, गणेश बोत्रे, शांताराम सोनवणे, रमेश राळे, डी.डी.भोसले, अमोल पानमंद, रोहिदास गडदे, मंगल चांभारे, आशा तांबे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच महेंद्र कोळेकर, मुख्याध्यापक धर्मराज पवळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबाजी सातपुते, उपाध्यक्ष योगेश कोळेकर, शिक्षक अमर केदारी, मंगल निमसे, अनिल बोर्‍हाडे, कल्याण पिंगळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी केले, आभार सरपंच महेंद्र कोळेकर यांनी मानले.

Previous articleन्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा गुन्हे दाखल करणार- पोलीस निरीक्षक नारायण पवार
Next articleनिधन वार्ता – सुशिलाबाई भागवत यांचे वृद्धापकाळाने निधन