मशिदी समोर हनुमान चालीसा पठण न करता सर्वधर्मीयांसमवेत मारुती मंदिरासमोर केली महाआरती – आ. अतुल बेनके

नारायणगाव ,किरण वाजगे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदी वरील स्पीकर वरून होणारे अजान बंद झाले नाही तर तेथे हनुमान चालीसा पठण करण्याचे राज्यात सर्वत्र मनसैनिकांना आदेश दिले असताना जुन्नर तालुक्यात मात्र एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. जुन्नर तालुका मनसेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख मकरंद पाटे व तालुकाप्रमुख साईनाथ ढमढेरे यांनी महाआरती चे व हनुमान चालीसा पठन करण्याच्या निर्णयाबाबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन महाआरती व हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय नारायणगाव येथील हनुमान मंदिरात करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच शिवसेना वगळता सर्वच पक्षातील पदाधिकारी या महाआरतीला उपस्थित होते.

याप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे, गणेश शेळके, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव खैरे, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, सुजित खैरे, रोहिदास केदारी, जयेश कोकणे, अतुल आहेर, मुकेश वाजगे, गणेश वाजगे, रामदास अभंग, मनसेच्या सोनाली पाटे, आरती भोसले, संगीता अडसरे, एडवोकेट रत्ना हांडे, आशा चव्हाण, शुभांगी शिंदे, हनुमान देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष शिवदास तांबे, उपाध्यक्ष राजकुमार कोल्हे, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष जुबेर शेख, तौसिफ कुरेशी, हेमंत कांबळे, स्वप्नील भुजबळ, आयाज जमादार, भाजप युवा मोर्चाचे प्रतिक जाधव, प्रदीप गुळवे, अक्षय खैरे, संकेत खैरे, शेतकरी संघटनेचे योगेश तोडकर, नंदकिशोर जगताप, रविराज चाळक, अवधूत अष्टेकर, अनिल देशपांडे, विजय कुचिक, दीपक गुंजाळ, मयूर वाळुंज, विनोद रांजणकर, दत्ता व-हाडी, नवनाथ खेबडे, गौतम औटी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमात जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सर्व धर्मीयांमध्ये शांतता व सुव्यवस्था तसेच सलोका राहण्यासाठी सर्वांना आवाहन केले यावेळी उपनिरीक्षक विनोद धुर्वे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleगांजाची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोघांना अटक ; पावणे दोन लाखांचा बेकायदा गांजा जप्त
Next articleमरकळ औद्योगिक नगरीमध्ये कामगार व महाराष्ट्र दिन ‘रक्तदान’ शिबीराने संपन्न