बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ६२ हजारांचा मुद्देमाल केला लंपास

प्रमोद दांगट प्रतिनिधी

घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बाभूळवाडी साल  येथील बंद घराचे दरवाजा तोडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश करून घरातील सुमारे ६२,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे तसेच घराच्या ,गाडीच्या काचा फोडल्या असून शेतातील साहित्यांची तोडफोड करून नुकसान केली आहे.याबाबत घर मालक सचिन सुरेश शिरोडकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन सुरेश शिरोडकर हे आपल्या कुटुंबासमवेत पुणे येथे राहत असून त्यांची आपल्या मूळ गावी बाभूळवाडी साल येथे जमीन व घर आहे ते आपल्या गावी जाऊन येऊन शेतीची व घराची देखभाल करत असतात तसेच शेतीची व घराच्या देखभालीचे काम गुलाब पोखरकर हे काम पाहत असतात (दि. १४) रोजी ते आपल्या गावी शेतीचे काम पाहण्यासाठी आले होते व शेतीची पाहणी करून ते घराच्या दरवाजाला कुलूप लावून व त्यांची चार चाकी गाडी टाटा झेनॉन घराच्या पार्किंगमध्ये लावून गुलाब पोखरकर यांना शेतीची व घराची देखभाल करण्यास सांगून पुणे येथे गेले. त्या वेळेत सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे फिर्यादी बरेच दिवस आपल्या गावी आले नाही त्यानंतर दिनांक २५/४/२०२० रोजी त्यांना त्यांच्या शेताची देखभाल करणारा गुलाब पोखरकर यांनी फोन करून सांगितले की कुणीतरी आपल्या घराचा दरवाजा मोडून घराच्या काचा फोडून घरातील सीसीटीव्ही कॅमेरे, फ्रिज, सिलिंग फॅन, गॅस शेगडी ,स्वयंपाकाची सर्व भांडी ,चार चाकी गाडीची बॅटरी, घराच्या वरच्या बाजूस असलेल्या बागेतील पाण्याच्या टाक्या चोरून नेण्यात आहे. त्यानंतर दिनांक ६/६/२०२० रोजी पुन्हा गुलाब पोखरकर यांनी फोन करून सांगितले की शेतातील तलावावर ठेवलेली पाण्याची मोटर कोणीतरी नेले असून घरातील सामानाची तोडफोड करून घराच्या काचा फोडून घरचा पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या टाटा झेनॉन गाडीचे टायर काढून नेले आहेत ,तसेच शेतातील लाईट ची डीपी, पिऊसी पाईप तोडून नुकसान केले आहे.व शेजारील डॉक्टर उपलेचवार यांच्या शेतातील कंपाऊंडच्या लोखंडी खांब ,जाळी देखील चोरी करून नेले असून कंपाऊंडचे काही खांब मोडून नुकसान केले आहे. मात्र त्यावेळी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन असल्याने घरमालक हे फिर्याद देण्यात आले नाही मात्र त्यांनी (दि.१३) रोजी अज्ञात चोरट्यां विरुद्ध घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार दि.२४ ते दि.६ या दरम्यान त्यांच्या घरातील
५,०००/-रु किंमतीचा फ्रीज,१,००० रु.किंमतीचे ३ सिलिंग फँन,५,००० रु किंमतीची गँस शगडी व भांडी,२,०००रु किंमतीची गाडीची बँटरी,२,५०० रु किंमतीच्या पाण्याच्या दोन टाक्या,१०,००० रु किंमतीचे चार चाकी गाडीचे,२५,००० रु किंमतीची पाण्यातील इलेक्ट्रिक मोटार,१२,००० रु.किंमतीची डाँ.सुचिता अतुल उपलेंचवार याचे शेतातील कंपाऊंडचे लोखंडी खांब व जाळी असा एकूण ६२,५०० रु. किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला असून घराच्या व गाडीचे काचा, घरातील सामान, लाईटची डि.पी, शेतातील कंपाऊड तोडून सुमारे २५,०००रु चे नुकसान केले आहे.

सदर घटनेची फिर्याद घर मालक सचिन सुरेश शिरोडकर यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास घोडेगाव पोलीस करत आहेत.

Previous articleअवसरी खुर्द येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन अड्ड्यांवर पोलिसांनी टाकला छापा
Next articleभिगवण शिक्षण प्रसारक मंडळास बी.ए ,बी.कॉम आणि एम. ए अभ्यासक्रमास मान्यता: अजित क्षीरसागर