निमगाव सोसायटीकडून १कोटी २८लाख कर्ज वाटप

राजगुरुनगर- निमगाव खंडोबा (ता.खेड) विकास कार्यकारी सहकारी सोसायटीने ३१ मार्च अखेर शंभर टक्के पीक कर्ज वसूल केले असून व सोसायटीने किसान क्रेडिट कार्ड नुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा दावडी अंतर्गत २५७ सभासदांना १५९ हे.९५ आर साठी १कोटी २८लाख कर्ज वाटप केला असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा दावडीचे विकास अधिकारी श्री सचिन खेडकर संस्थेचे सचिव श्री दत्तात्रेय रोडे यांनी दिली .

यावेळी चेअरमन श्री अनिल गुलाबराव शिंदे, व्हाईस चेअरमन श्री खंडेराव सोनवणे , संचालक श्री बाळासाहेब गोपाळा शिंदे, श्री भगवान शंकर शिंदे, श्री केशव दौलत शिंदे,श्री सोपान लक्ष्मण शिंदे, श्री युवराज राजाराम शिंदे, श्री मनोहर किसन गोरगल्ले, तज्ञ संचालक . श्री दशरथ गुलाब शिंदे, तज्ञ संचालक श्री बाळासाहेब श्रीपती येवले व ग्रामस्थ श्री बबन तुकाराम शिंदे श्री संजय माणिक शिंदे, श्री दिलीप गेनभाऊ शिंदे, श्री किरण बबन शिंदे श्री विशाल माणिक शिंदे, श्री बाळासाहेब लक्ष्मण शिंदे, श्री विठ्ठल उध्दव शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleनिलेश सरवदे स्वरचित ‘पांथस्थ’ या कवितासंग्रहाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन
Next articleवन नेटवर्क एंटरप्रायझेसच्या वतीने संगणक सख्य प्रकल्पाचा शुभारंभ