कुरकुंभ एमआयडीसीतील एमक्युअर कंपनीत १२ लाखांच्या केमिकलची चोरी

सुरेश बागल,कुरकुंभ

एमआयडीसी मधील एमक्युअर फार्मास्युटीकल लिमिटेड
या कंपनीमधील ३ किलो ४६६ ग्रॅम पॅलेडियम ऑन कार्बन या केमिकलची सुमारे १२ लाख ५४ हजार ९४७ रूपये किंमतीच्या केमिकलची चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे व्यवस्थापक राहुल हनुमंत मोरगावकर ( वय ५२ रा . शालीमार चौक ) यांनी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती नुसार कुरकुंभ औद्योगीक वसाहतमधील एमक्युअर फार्मासुटीकल लिमीटेड प्लॉट नं. डी.२४ आणि २४/१ या कंपनीमध्ये वेअर हाउस ( स्टोअर) मध्ये पॅलेडियम ऑन कार्बन ( ५० % वेट ) हा कच्चा माल ठेवलेला असतो . हे अंत्यत संवेदनशील रसायन आहे . (ता.२८ मार्च २०२२ ) रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास कंपनीचे वेअर हाऊस विभागाचे अधिकारी श्रीकांत जाधव यांनी स्टॉकची तपासणी करताना १०% व पॅलेडियम ऑन कार्बन ( ५० %) कच्चा माल अंदाजे ३ किलो ४६६ ग्रॅम या ठिकाणी नसल्याचे निदर्शानास आले . त्यांनी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी अशोक राठोड यांना बोलावुन तेथे माल नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले . त्यांनी कंपनीतील सी.सी.टि.व्ही फुटेज तपासले तसेच कर्मचारी यांच्याशी याबाबत चौकशी केली . मात्र या ठिकाणावरील माल कुठे गायब झाला हे निष्पन्न झाले नाही. ३ किलो ४६६ ग्रॅम , एका किलोची किंमत ३ लाख ६२ हजार ७४ पैसे ) प्रमाणे १२ लाख ५४ हजार ९४७ किंमतीचे हे रासायनिक अज्ञात चोरट्यांनी चोरू नेले आहे .याबाबत कंपनीचे व्यवस्थापक राहुल मोरगावकर यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये मोठी टोळी असून मुंबई तसेच इतर राज्यांतील रासायनिक केमिकल युक्त चोरी करणाऱ्या चोरांचा यामध्ये समावेश असू शकतो असे पोलिसांकडून सांगण्यात आले व पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous articleपबजी गेम खेळायला मोबाईल घेण्यासाठी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण चोरी करणारा १८ वर्षीय चोरटा जेरबंद
Next articleनिलेश सरवदे स्वरचित ‘पांथस्थ’ या कवितासंग्रहाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन