पबजी गेम खेळायला मोबाईल घेण्यासाठी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण चोरी करणारा १८ वर्षीय चोरटा जेरबंद

राजगुरुनगर- पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल हवा यासाठी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण चोरी करण्याऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे.

मालती रामदास भगत (रा.राक्षेवाडी,राजगुरूनगर) या राक्षेवाडी येथे किराणा घेण्यासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने दुचाकी वर भरधाव वेगाने येऊन त्यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाचे गंठण जबरदस्तीने हिसकावून पळून गेले होते.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की ,सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी वापरलेली मोटार सायकल ही हिंगणगाव ता.शिरूर ,जि. पुणे येथील एक जण वापरत असलेचे समजले त्यावरून सदर ठिकाणी सापळा रचून सदर वर्णनाची गाडी आणि ती वापरत असणाऱ्या एकास ताब्यात घेतले असता,त्याने त्याचे नाव अजय राजु शेरावत (वय १८, रा.हिंगणगाव,ता.शिरूर, जि. पुणे) असे सांगितले.

खेड येथील सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याचे साथीदारसोबत केला असल्याचे सांगत आहे . सदरील आरोपी यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी खेड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, खेड उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलिस उपनिरीक्षक, शिवाजी ननवरे, पो हवा अतुल डेरे, विजय कांचन, पो ना बाळासाहेब खडके, अमोल शेडगे ,पो कॉ धिरज जाधव,
दगडू विरकर , पूनम गुंड यांनी केली आहे.

Previous articleवाकी बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ टोपे तर उपाध्यपदी धनंजय कड पाटील यांची बिनविरोध निवड
Next articleकुरकुंभ एमआयडीसीतील एमक्युअर कंपनीत १२ लाखांच्या केमिकलची चोरी