वाकी बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ टोपे तर उपाध्यपदी धनंजय कड पाटील यांची बिनविरोध निवड

चाकण- वाकी बुद्रुक( ता.खेड) भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ टोपे तर उपाध्यपदी धनंजय कड पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत विनोद उर्फ पप्पू दादा टोपे यांच्या नेतृत्वाखालील पॕनलने १३/० असा दणदणीत विजय मिळवला होता.

काल (दि.२९) रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी सोमनाथ टोपे तर उपाध्यक्षपदी धनंजय कड पाटील यांची निवड करण्यात आली.

संचालक मंडळाच्या वतीने या दोन्ही उमेदवारांना कामाची प्रथम संधी दिली.सोमनाथ टोपे यांनी या आधी विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर अनेक वर्ष काम केले आहे तर धनंजय कड हे देखील इंजिनिअर असून सुशिक्षित आहे. सहकारी सोसायटीवर पहिल्यांदाच तरुणांना काम करण्याची संधी मिळाली आहे.

विनोद उर्फ पप्पूदादा टोपे, ज्ञानेश्वर टोपे, बापू गारगोटे, माऊली टोपे, रामचंद्र गारगोटे, मारुती गायकवाड, रामदास चव्हाण, चंद्रभागा गारगोटे, सविता गारगोटे, काळुराम टोपे, दत्तात्रय टोपे तसेच सभापती विनायक घुमटकर, राष्ट्रवादीचे युवा नेते मयुर मोहिते पाटील , युवा नेते रोहन मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleमुळशीत तालुक्यात पुन्हा मुळशी पॅटर्नचा थरथराट
Next articleपबजी गेम खेळायला मोबाईल घेण्यासाठी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण चोरी करणारा १८ वर्षीय चोरटा जेरबंद