कृषीभूषण आदर्श प्रगतशील शेतकरी दौलतराव गाडे यांचा ७५ वा वाढदिवस सिद्धेगव्हाण येथे दिमाखात संपन्न

सिद्धेगव्हाण – येथील आदर्श प्रगतीशील शेतकरी गाडे परिवाराचे आधारस्तंभ प्रेरणास्थान दौलतराव मारुती गाडे (तात्या) यांचा ७५ वा वाढदिवस अमृतमहोत्सव सोहळा त्यांचे थोरले चिरंजीव भैरवनाथ विद्यालयात असणारे प्रा.राजेंद्र गाडे ,धाकटे चिरंजीव आदर्श युवा शेतकरी आत्माराम गाडे एक कन्या सुनिता लोखंडे पुतणे प्रगतीशील शेतकरी शिवाजी गाडे यांच्या संकल्पना व सुंदर नियोजनातून थाटामाटात संपन्न झाला.

तात्यांनी संपूर्ण जीवनात सत्य न्याय नीतीने संसार आणि आदर्श पद्धतीने शेती केली प्रामाणिक कष्ट .जिद्द चिकाटी संयम आणि कामाचे योग्य नियोजन ही त्यांच्या यशस्वी जीवनाची व सुखी संपन्न कुटुंबाची चतुःसुत्री आहे.

आयुष्यभर काळ्या आईची सेवा करुन तिला हिरवा शालू नेसवण्याचे काम तात्यांनी केले.प्रचंड काबाडकष्ट करून तिनही मुलांना उत्तम शिक्षण व संस्कार दिले.शेतीच्या पैशातून जमीन जागा खरेदी करत भौतिक प्रगती केली.हा संसाराचा गाडा चालवताना त्यांची धर्मपत्नी दौपदाबाई गाडे ( नानीनी ) त्यांना कामात सुख दुःखात भक्कम साथ दिली.

७ वी शिकलेल्या तात्यांनी शिक्षणाचा पाया भक्कम केलाच त्याचबरोबर आपली मुले नातवंडे पुतणे यांना विचारांची संस्काराची शिदोरी दिली त्यांचा मुलगा पुतण्या व एक नातु शिक्षक म्हणून काम करत आहे तर दोन नातू बी ए एम एस चे शिक्षण घेत आहेत उत्तम माणुस म्हणून जगायला शिकविले.

तात्यांचा गावातील काकड आरती भजन सप्ताह यामध्ये सक्रिय सहभाग असतो. शाळेसाठी सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी आर्थिक मदत करुन दातृत्व भावना जोपासली.वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले व नवीन हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिली.

तात्यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व सिद्धेगव्हाण ग्रामस्थ पंचक्रोशीतील शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई पानसरे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांनी शुभेच्छा व सदिच्छा दिल्या. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे  युवा नेते मयुर मोहिते पाटील, सिद्धेगव्हाण लोकनियुक्त आदर्श सरपंच साधनाताई चौधरी उपसरपंच मोनिकाताई गाडे मा.आदर्श सरपंच शशिकांत मोरे मा.उपसरपंच सत्यवान काळे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पंचक्रोशीतील गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन संचालक उपस्थित होते.रोहन मोहिते ,पठाणराव वाडेकर ,डाॅ.आहेर मॅडम ,सत्यवान काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रवचनकार ह.भ.प निलमताई पोतले वडघुले यांनी तात्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा परिचय करून आध्यात्मिक दाखले देऊन गौरवोद्गार काढले.ज्यांच्या नावातच दौलत आहे असे प्रेमळ कष्टाळू आदर्श व्यक्ती मत्व म्हणजे तात्या. ज्यांच्या कडे धन आहे मोठे मन आहे विचारांची संस्काराची संपत्ती आहे.

पांडुरंग दंग झाला
हा सोहळा पाहून
जणू तुका आला वाटे
पुन्हा वैकुंठाहून

असा आनंदी आदर्श सोहळा थाटामाटात स्नेहभोजनाने संपन्न झाला झाला . संपूर्ण गाडे परिवार सर्व सिद्धेगव्हाण ग्रामस्थ नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते

कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन स्वागत प्रास्ताविक पुतणे आदर्श शिक्षक कवी महेंद्र गाडे यांनी केले .आभार चिरंजीव प्रा.राजेंद्र गाडे यांनी मानले.

Previous articleबोरघर ग्रामस्थांकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवतांचा गौरव
Next articleमुळशीत तालुक्यात पुन्हा मुळशी पॅटर्नचा थरथराट