अवसरी खुर्द येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन अड्ड्यांवर पोलिसांनी टाकला छापा

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून आहे.यावेळी पोलिसांनी दारूसाठा जप्त केला असून दारू विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवसरी खुर्द परिसरात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. खराडे यांनी कारवाईची सूचना केली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक एस. एस. खबाले, पोलिस हवालदार जी.ए .डावखर हे अवसरी गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना चर्मकारवस्ती जवळ एक इसम लाल रंगाच्या अल्टो कारमध्ये विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करताना आढळला. पोलीस आल्याचे पाहून दारू विक्री करणारा राजाराम सीताराम टेमकर रा. अवसरी खुर्द हा पळून जावू लागला .मात्र पोलिसांनी त्यास जागीच पकडले. त्याच्याकडून रु ६७६ रुपये किंमतीच्या १३ दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई आदिनाथ लोखंडे यांनी फिर्याद दिल्यानंतर राजाराम सीताराम टेमकर याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या घटनेत अवसरी खुर्द गावच्या हद्दीत हौसाबाई सदाशिव राजगुरू ही महिला तिचे राहते घराचे खिडकीजवळ बाहेरील बाजूस विनापरवाना देशी दारूची विक्री करत होती .पोलीस आल्याचे पाहून ती पळून जावू लागली .मात्र पोलिसांनी दिला जागीच थांबवले. तिच्याकडून पोलिसांनी २७०४ रु किंमतीच्या ५२ दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी महिला पोलीस शिपाई नीलम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हौसाबाई सदाशिव राजगुरू रा.अवसरी खुर्द हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार डावखर करत आहे.