राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने पोलिसांची आरोग्य तपासणी

घोडेगाव – पोलीस स्टेशन येथे आंबेगांव तालुका राष्ट्रवादी क्राॅंग्रेस डाॅक्टर सेलच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, तसेच गृहरक्षक दलाचे जवान यांची आरोग्य तपासणी करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस डॉ हरीश खामकर यांनी दिली .

सदर शिबीरामध्ये मंचर येथील डाॅ. प्रतिक गायकवाड, डाॅ. प्रताप वळसे, दंतरोग तज्ञ डाॅ. हरीश खामकर, तसेच घोडेगाव येथील डाॅ.प्रवीण पोखरकर यांनी सहभाग घेतला होता तसेच पुणे येथील एटोन रेमेडिस या फार्मा वतीने रक्ताच्या चाचण्या केल्या. सर्व वैदयकीय टीम यांनी पोलीस स्टेशनमधील 3 अधिकारी, 30 कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे 5 जवान यांची तपासणी केली.

मधुमेह, उच्च रक्तदाब, जुने आजार, तसेच ईसीजी व दातांचे आजार या सर्व तपासण्या केल्या. डाॅ.प्रवीण पोखरकर घोडेगाव यांनी मंचर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांचेसाठी कॅल्शियमचे, रक्तवाढीचे, व इतर आजारावरील गोळया औषधे आणि फस्ट येड किट उपलब्ध करून दिले. त्याबाबत सर्व डाॅक्टरांचे घोडेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन आभार व्यक्त करण्यात आले त्यावेळी डाॅक्टरां चे वतीने बोलताना डाॅ. प्रतिक गायकवाड यांनी शिबिरासंदर्भात माहिती दिली.तर डॉ प्रताप वळसे यांनी राष्ट्रवादी डॉ सेलच्या माध्यमातून अशा प्रकारचे आरोग्य विषयी शिबीराचे आयोजन करून कोणाला काही गंभीर आजार असल्यास त्याचे निराकरण करणेकामी मागदर्शन करणार असलेबाबत सांगितले. त्यानंतर उपस्थित सर्वांचे घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री.जीवन माने यांनी आभार मानले

Previous articleउरुळी कांचनमध्ये श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न
Next articleबोरघर ग्रामस्थांकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवतांचा गौरव