उरुळी कांचनमध्ये श्रीकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

उरुळी कांचन

परमेश्वर श्रीचक्रधर स्वामीच्या काळात स्वामीच्या सन्नीधानी जे भक्त जण होते ते सर्व भिक्षा मागुन यायचे त्या भिक्षेतील पदार्थ बाईसा स्वामींना आरोगणेसाठी देत असत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या पदार्थांचा स्वीकार करत असत व स्वामीचा राहिलेला प्रसाद बाईसा भक्तांना देत असत. तसाच सोहळा सर्व भक्त जणाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला यानिमित्ताने भक्त जणांना अतिशय आनंद झाला. उरुळी कांचन येथील श्रीकृष्ण मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने सार्वजनिक पंचावतार उपहार महोत्सव मोठ्या उत्साहात भक्तांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी सुबोधमुनी धाराशिवकर, रविराज पंजाबी, अनिल बाबा, माऊली कांचन, दत्तात्रय कांचन, आबासाहेब कांचन, राजेंद्र टिळेकर, शरद वनारसे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, संजय कांचन, संचिता कांचन, भाऊसाहेब कांंचन, अमित कांचन, कोंडीराम चौधरी, शिवाजी भोसले, उत्तम चौधरी, संजय वनारसे, मोहन कदम, बाबासाहेब चौधरी, राजु कांचन, बापु कांचन, लाला कांचन, अतुल सावंंत आदी सदभक्त महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन
Next articleराष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या वतीने पोलिसांची आरोग्य तपासणी