आरटीआय नंदकुमार बोऱ्हाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी अखेर जेरबंद

मोसीन काठेवाडी,घोडेगाव

माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे जेरबंद” घोडेगाव येथे राहणारे श्री. नंदकुमार उर्फ भाऊसाहेब बोराडे हे माहिती अधिकार कार्यकर्ते असून त्यांच्यावर हल्लेखोरांनी दि. १०/०३/२०२२ रोजी कोयत्याने हल्ला करून त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यात त्यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली होती त्याबाबत घोडेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर ५२/२०२२ भा. दं. वी. कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्हयातील आरोपी हे नंदकुमार बोराडे यांना अनोळखी असल्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता मोठ्या अडचणी येत होत्या.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री मितेश घट्टे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील सो यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पो. हवा, विक्रम तापकीर, दीपक सावळे, राजू मोमीन, गुरू जाधव, अतुल डेरे, पो ना संदीप वारे, पो.कॉ. अक्षय नवले. निलेश सुपेकर, स. फो. मुकुंद कदम, घोडेगाव पो.स्टे. चे सपोनि श्री जीवन माने व पो. स.ई. श्री. किशोर वागज, सतीश डोले, अनिल चव्हाण यांचे पथक नेमलेले होते.

नमूद पथकाचे आधारे तपास करीत असताना नमुद पथकास तांत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, जितेंद्र प्रभाकर काळे याचे आडोसा नावाने नंदकुमार बोराडे यांच्या घराशेजारी परमिट रूम आणि बियर बार आहे. सदर बियर बार बंद करण्याबाबत नंदकुमार बोराडे यांनी वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग व ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या तसेच जितंद्र काळे यांनी बांधलेल्या रहिवाशी सोसायटीमधील सांडपाणी कॅनलमध्ये सोडले जाते याबाबत नंदकुमार बोराडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून जितेंद्र प्रभाकर काळे याने सदरचा गुन्हा केलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने जितेंद्र काळे यास ताब्यात घेवून त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा मुंबई येथील राहणारा त्याचा लहानपणीचा मित्र योगेश पवार व त्याचे इतर साथिदार यांनी मिळून नंदकुमार बोराडे याला मारण्याची योजना आखली त्यानुसार इसम नामे जाफर शमीम अहमद, वय २४ वर्षे, रा मुंब्रा, मुंबई व शबाझ मेमन यांनी १ चारचाकी व १ दुचाकी गाडीतून येवून त्यांनी नंदकुमार बोराडे यांचेवर हल्ला केला असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयामध्ये १) जितेंद्र प्रभाकर काळे, २) योगेश मोहन पवार, वय ४० वर्षे, रा घाटकोपर, मुंबई, ३) जाफर शमीम अहमद, वय २४ वर्षे, रा मुंब्रा, मुंबई यांना ताब्यात घेण्यात आले आहे सदर गुहयामध्ये आणखी १ आरोपी फरार असून त्याचा शोध चालु आहे गुन्हयाचा अधिक तपास घोडेगाव पोलीस स्टेशन येथे चालु आहे.

Previous articleलोहगड सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदा साबळे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण साबळे यांची बिनविरोध निवड
Next articleमाहिती आधिकार कार्यकर्ते नंदकुमार बोऱ्हाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी जेरबंद