थोरांदळे येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Ad 1

प्रमोद दांगट : प्रतिनिधी

 आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील एका महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या नवऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी महिला व तिचा नवरा संजय टेमगिरे यांची थोरांदळे येथे शेती असून संजय टेमगिरे यांचा मित्र सचिन एकनाथ नरवडे ( रा.पिंपरखेड ता.शिरूर पुणे) याने संजय टेमगिरे दारूच्या नशेत असताना त्यांची जमीन लिहून घेत ती दुसऱ्या व्यक्तीला विकली तसेच संजय टेमगिरे यांच्या बँक खात्यावरील सर्व रक्कम गोड बोलून काढून घेतली त्यामुळे संजय टेमगिरे यांचे मानसिक संतुलन बिघडले होते त्यानंतर दिनांक १०/८/२०२० रोजी फिर्यादी महिला व तिचा नवरा हे गावात हनुमान मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना संजय टेमगिरे यांनी एका व्यक्तीकडे हात करत सांगितले की हा सचिन नरवडे असून आपली जमीन यानेच विकली व माझ्या खात्यावरील सर्व पैसे काढून घेतले त्यावेळेस फिर्यादी महिला सचिन नरवडे यास तू आमची जमीन का विकली आमचे पैसे का काढले असे विचारण्यात गेली असता नरवडे यांनी तू मला विचारणारी कोण असे म्हणत तिचा हात पिरगाळून तिचा विनयभंग करत तिला व तिच्या नवऱ्याला शिवीगाळ केली असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ईश्वर कदम करत आहेत.