लोहगड सोसायटीच्या अध्यक्षपदी नंदा साबळे तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण साबळे यांची बिनविरोध निवड

पवनानगर – लोहगड विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती.तर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूकही बिनविरोध करण्यात आली. या निवडणुकीमध्ये अध्यक्ष पदासाठी नंदा संतोष साबळे यांचा एकमेव अर्ज दाखल आला होता.त्याचबरोबर उपाध्यक्ष पदासाठी लक्ष्मण रामा साबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये एक एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध करण्यात आली. सदर निवडणुकी ही निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निंबधक विठ्ठल सुर्यवंशी, विनोद कोतकर तर सचिव सदिप साबळे यांच्या समक्ष झाली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले,अनिल साबळे, बाळासाहेब जाधव,माजी चेअरमन गणेश धानिवले, रोहिदास साबळे,लहु साबळे, पोलीस पाटील भरत साबळे, सुरेश साबळे,चंद्रकांत साबळे, प्रशांत साबळे,माजी उपसरपंच प्रदिप साबळे यांच्या सह सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते.

Previous articleभारतीय मजदूर संघाची ९ मे रोजी महागाईच्या विरोधात राज्यभर निदर्शने
Next articleआरटीआय नंदकुमार बोऱ्हाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी अखेर जेरबंद