स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नारायणगाव येथे विकास कामांचे उद्घाटन

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आज जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या प्रयत्नातून राजवाडा येथील १५ घरकुलांची दुरुस्ती (अंदाजे ७ लाख ५० हजार रुपये) या कामाचे उदघाटन आशाताई बुचके व सरपंच योगेश पाटे यांच्या हस्ते पार पडले.या कामासाठी सरपंच पाटे आणि वार्ड क्रमांक ४ चे सदस्य राजेश बाप्ते यांनी विशेष पाठपुरावा केला.

उद्घाटन प्रसंगी विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, उपसरपंच सारिका डेरे, अक्षय (बाळा) वाव्हळ, अजित वाजगे, हेमंत कोल्हे, नंदू अडसरे, जालिंदर खैरे, किरण ताजने, संकेत क्षीरसागर, पप्पू भूमकर, सुनील वाव्हळ, दिनेश वाव्हळ, अभय वाव्हळ, गणेश वाव्हळ, अक्षय वाव्हळ, स्थानिक ग्रामस्थ व बौद्ध विकास मंडळाचे कार्येकर्ते उपस्थित होते.

दरम्यान सरपंच पाटे यांनी राजवाडा येथील चावडीच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रु.मंजूर केल्याची घोषणा केली. लवकरच त्याचे काम सुरू होईल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत क्षीरसागर यांनी केले. तर आभार सुनील वाव्हळ यांनी मानले.