सावंत प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार राहुल शिंदे व ह.भ.प आंनद तांबे महाराज यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

उरुळी कांचन

कै.दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राहुलजी शिंदे तसेच अध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे वृद्ध कलावंत साहित्यिक मानधन समिती पुणे जिल्हा सदस्य, सल्लागार समिती सदस्य, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ पिंपरी चिंचवड महानगरपालिका चिंचवड देवस्थानचे ट्रस्ट विश्वस्त ह. भ. प. श्री.आनंद तांबे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार आमदार संजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सावंत प्रतिष्ठानच्या वतीने गेली पंचवीस वर्षांपासून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराचे वितरण आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय जगताप यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व साहित्यिक, वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य संजय सावंत यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. दरवर्षी न चुकता या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. निस्वार्थी भावनेने समाजातील मान्यवरांचा गौरव केला जातो हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुरस्कारार्थी राहून शिंदे व हभप आनंद तांबे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत, सदस्य डॉ सुमित काकडे, काँग्रेस राज्यकार्यकरिणीचे पदाधिकारी गणेश जगताप, माजी सरपंच संभाजी काळाने, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार, राष्ट्रीय खेळाडू माणिक पवार, नंदकुमार कामठे, विलास उंदरे, लक्ष्मण साळुंखे आदी उपस्थित होते.

Previous articleथेऊर- अंगारकी चतुर्थीच्या निमित्त व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
Next articleपेरणे- वढु खुर्द येथील ‘शीवरस्ता’चं झालायं ‘गायब