थेऊर- अंगारकी चतुर्थीच्या निमित्त व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

उरुळी कांचन

अंगारकी चतुर्थीच्या निमित्त व्हिलेजर्स फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन शिबिरावेळी मोठ्या उत्साहात गणेश भक्तांनी आपला सहभाग नोंदविला. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प.आनंद महाराज तांबे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी व्हिलेजर्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजेश काळभोर सर, तर्पण ब्लड बँकेचे डॉ.प्रविण नवले सर व इतर मान्यवर उपस्थित होते. तर्पण ब्लड बँक, विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये ६० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. या वेळी व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. ईश्वर सेवेला मानव सेवेची झालर देणाऱ्या व्हिलेजर्स फाऊंडेशनच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Previous articleआंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात
Next articleसावंत प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार राहुल शिंदे व ह.भ.प आंनद तांबे महाराज यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान