ओझरच्या विघ्नहराचे अंगारकी चतुर्थीला लाखो भाविकांनी घेतले दर्शन

नारायणगाव : किरण वाजगे

अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर (ता.जुन्नर) येथे अंगारकी चतुर्थी निमित्त सुमारे एक लाख भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. पहाटे ४ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे, विश्वस्त उपाध्यक्ष रंगनाथ रवळे, आनंदराव मांडे,श्रीराम पंडित यांच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये अंगारकी चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान गणेशभक्त सुरेंद्र कुलथे, डॉ.राजेंद्र तुकाराम आव्हाड, सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर, गणेशभक्त भरत लेंडे, आनंदराव मांडे, यांना मिळाला. पहाटे चार ते रात्री अकरापर्यंत रांगेत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

अंगारिका चतुर्थी निम्मित श्री विघ्नहरा समोर पन्नास हजार रुपये किमतीचे आंबा या फळाची आरास संजुशेठ पानसरे संचालक वि.स.सा.का . यांच्या वतीने करण्यात आली. सकाळी ७.०० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर बाग ,चप्पल स्टँड, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.

सायंकाळी ७.०० वा नियमित हरिपाठ करण्यात आला. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प. मोहिनीताई पाबळे यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत शिरोली खु!! येथील भजनी मंडळाने दिली. रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले. आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी देवस्थान ट्रस्ट च्या विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला पुढील प्रमाणे देणगी दिली.

गणेशभक्त सुरेंद्र कुलथे १,११,१११/-
गणेशभक्त डॉ.राजेंद्र तुकाराम आव्हाड १,११,१११/-, भरतशेठ लेंडे २१,१११/-
गणेशभक्त आनंदराव मांडे २१,१११/-
अंगारिका चतुर्थी निम्मित सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी ११,१११/-.
आज च्या शुभदिनी श्री विघ्नहराच्या दर्शनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक गोविंदशेठ खिल्लारी ,वि.स.सा.का चेअरमन सत्यशील शेरकर ,उद्योजक हेमंत राजमाने, ओझर नं-१ च्या सरपंच मथुरा कवडे , ओझर नं-२ च्या सरपंच तारामती कर्डक उपस्थित होते

आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे ,उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे , विश्वस्त बी.व्ही.अण्णा मांडे ,रंगनाथ रवळे, आनंदराव माडे, किशोर कवडे, मंगेश मांडे, गणपत कवडे, मिलिंद कवडे, कैलास मांडे, विजय घेगडे , श्रीराम पंडित,व राजश्री कवडे यांनी केले. कोरोना चे सर्व नियम पाळून गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी समिरभाऊ थिगळे यांची फेरनिवड
Next articleआंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात