हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

राजगुरुनगर- खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले.

यावेळी आत्मनिर्भर भारताच्या घोषणा दिल्या गेल्या. या प्रसंगी संचालक बाळासाहेब सांडभोर, मुरलीधर खांगटे, प्राचार्य डॉ. व्ही. डी.कुलकर्णी, प्राचार्य डॉ. शिल्पा जगताप, उपप्राचार्य प्रा. एस.एन. टाकळकर, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विविध ऑनलाइन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

त्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक विभागाच्या वतीने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आणि क्रीडा व इतिहास विभागाच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मराठी विभागाच्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करताना एकमेव लोकमान्य, साहित्यिक अण्णा भाऊ साठे, कोरोनाने मला काय शिकवले, ऑनलाईन शिक्षणाची व्यवहार्यता असे विषय देण्यात आले आहेत.

Previous articleउरुळी कांचन येथे कोरोनामुळे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यु
Next articleपोलिस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त – उपमुख्यमंत्री अजित पवार