महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी समिरभाऊ थिगळे यांची फेरनिवड

राजगुरूनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मनसेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी समिरभाऊ थिगळे यांची फेरनिवड केली आहे तसे अधिकृत पत्र आज मुंबई या ठिकाणी देण्यात आले.

चार वर्षांपूर्वी समिर थिगळे यांची नियुक्ती करण्यात आली होती गेले ,४ वर्षें त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगले काम केले आहे .त्यांच्या नेतृत्वाखाली खेड व शिरूर येथे कोरोना काळात महावितरण कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती तसेच विविध आंदोलन करण्यात आली होती त्याचीच पोचपावती म्हणून त्यांना पुन्हा एकदा जिल्हा अध्यक्ष करण्यात आले आहे.

यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज खराबी,मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, खेड तालुका सचिव नितिन ताठे,राजगुरूनगर शहर अध्यक्ष श्री सोपान डुंबरे, उद्योजक गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

Previous articleगावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला मंचर जवळ अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
Next articleओझरच्या विघ्नहराचे अंगारकी चतुर्थीला लाखो भाविकांनी घेतले दर्शन