नारायणगावच्या मुक्ताई ,काळोबाच्या यात्रेत तमाशा सप्ताहसह, भव्य पालखी, छबिना मिरवणूक, शोभेचे दारूकाम, कुस्त्यांचा आखाडा रंगणार

नारायणगाव : किरण वाजगे

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा भरवला जाणारा नारायणगावचा श्री मुक्ताई काळोबा देवस्थानचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री मुक्ताई काळोबा देवस्थानचे संयुक्त अध्यक्ष संतोष खैरे, सुजित खैरे, सरपंच योगेश पाटे यांनी दिली. रविवार दि. १७ रोजी कांबळा बैठकीत चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ग्रामस्थांनी वर्गणी कांबळ्यावर आणून देण्याचे आवाहन करण्यात आले.
मुक्ताई व काळोबा देवस्थानची यात्रा दि. २६ एप्रिल ते २ मे अशी सात दिवस होणार आहे. यात्रेच्या काळात सात लोकनाट्य तमाशा, शोभेचे दारूकाम, कुस्त्यांचा आखाडा, छबिना मिरवणूक, देवीस चोळी पातळ, शेरणी वाटप अशाप्रकारे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दि‌. २६ एप्रिल रोजी यात्रेचा प्रारंभ होणार असून सकाळी ९ ते १० उत्सवमूर्ती व पादुकांची मिरवणूक, दि.२७ एप्रिल सकाळी ८ ते दुपारी १२ देवीचा उत्सव, मांडव-डहाळे, शेरणी नैवेद्य, रात्री ८ वाजता देवीस चोळी पातळ. दि‌.२८ एप्रिल यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी ७ ते १० काळोबा देवस्थान मांडव डहाळे, देवीस चोळी पातळ, शेरणी नैवद्य, सायंकाळी ६ वाजता श्री मुक्ताई भजनी मंडळाचा कार्यक्रम. सायंकाळी ८ वाजता छबिना मिरवणूक रात्री ९ वाजता शोभेचे दारूकाम. दि.२९ एप्रिल रोजी दुपारी ३ ते रात्री ७ दरम्यान महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या उपस्थितीत कुस्त्यांचा जंगी आखाडा. दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेची बाजारपेठेतून मिरवणूक. व सतत सात दिवस रोज रात्री दहा वाजता लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे.

Previous articleनारायणगांव वारूळवाडी येथील द्वारकामाई येथे साईंचा विशाल भंडारा व रक्तदान शिबिराचे आयोजन
Next articleनारायणगावात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा