कवठे येमाई येथील यात्रेला रंगला कुस्त्यांचा भव्य आखाडा

धनंजय साळवे- कवठे येमाईत येमाई च्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन करण्यात आले होते. यात पारनेर, श्रीगोंदा, नगर, हवेली, भोसरी,संगमनेर,सुपा,ई.तालुक्यातील नामांकीत पहिलवानांनी हजेरी लावली.

शिरापुर,आण्णापुर,डोंगरगण,म्हसे,कवठे येथील पहिलवानांनी प्रेक्षकांकडुन विशेष वाहवा मिळविली.पहिलवान शिवा उचाळे ,प्रतिक गाडेकर,अक्षय पवार,यांच्या कुस्त्या प्रेक्षणीय होत्या .शेवटची मानाची कुस्ती शिरापुरच्या शिवा उचाळे व भोसरीच्या पहिलवानाची झाली डाव प्रतिडावाची मेजवाणी प्रेक्षकांना पहायला भेटली.अखेर अनुभवाच्या जोरावर शिवा उचाळे यांनी बाजी मारली.पंच म्हणुन दिनकर घोडे, रामदास इचके, काशिद,घोडे,प्रतिक गाडेकर, धोंडिबा हिलाळ यांनी काम पाहिले. याप्रसंगी सरपंच रामदास सांडभोर,युवानेते बाळासाहेब डांगे,मा.सरपंच बबनराव पोकळे, दिपक रत्नपारखी,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, बबुशा कांदळकर पाटील, सोपानशेठ मुखेकर, हौशीराम मुखेकर,चेअरमन विक्रम इचके, उपचेअरमन बबु वागदरे,गव्हवरमेंट कॉन्ट्रॅक्ट र भाऊ घोडे पाटील,बाजीराव उघडे,आबा वागदरे, निखिल घोडे,पांडुरंग भोर,बबनराव पोकळेमामा किसन हिलाळ,संतोषमामा घोडे ई.मान्यवर उपस्थित होते.

Previous articleसविधान मानवी जीवनासाठी पथदर्शक- प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव
Next articleनारायणगांव वारूळवाडी येथील द्वारकामाई येथे साईंचा विशाल भंडारा व रक्तदान शिबिराचे आयोजन