उरुळी कांचन येथे कोरोनामुळे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यु

अमोल भोसले,उरुळी कांचन – प्रतिनिधी

उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मागील चोवीस तासाच्या कालावधीत कोरोनामुळे एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह दोन जणाचा मृत्यु झाला आहे. वरील दोघांच्या मृत्युमुळे उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील पंधरा दिवसात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा सहा वर पोहोचला आहे.

तर दुसरीकडे उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मागील चोवीस तासाच्या कालावधीत कोरोनाच्या सात नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे उरुळी कांचन हद्दीतील रुग्णांची संख्या १९२ वर पोचली असुन,  त्यापैकी १४५ जणांना  उपचारानंतर घऱी सोडले आहे. तर सहा  जणांचा  मृत्यु झाला आहे. तर सध्या  कोरोना बाधीत ४१ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार घेणाऱ्यात उरुळी कांचन व परीसरातील अनेक राजकीय व्यक्तींचा समावेश आहे.
उरुळी कांचन येथील रहिवाशी असलेल्या एकोणसाठ वर्षीय सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांला  दोन दिवसापुर्वी अचानक श्वास घेण्यास त्रास जाणवु लागल्याने, कोरेगाव मुळ परीसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार चालु असतानाच, गुरुवारी (ता. १३) सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान वरील अधिकारी सहा महिण्यापुर्वी पोलिस दलातुन निवृत्त झाले होते. त्यांनी लोणी काळभोर, यवत, इंदापुर, दौंड कोल्हापूर सह अनेक पोलिस ठाण्यात अधिकारी म्हणुन कामगिरी बजावली होती.

दरम्यान उरुळी कांचन ग्रामपंचाय हद्दीतील आणखी एका साठ वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार चालू होते.
याबाबत अधिक माहिती देतांना उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिकारी डॉ. सुचिता कदम म्हणाल्या, गुरुवारी (ता . १३) सायंकाळी दोन कोरोना बाधीत रुग्णांचा उपचार चालु असतांना मृत्यु झालेला आहे. यामुळे मागील पंधरा दिवसाच्या कालावधीत उरुळी कांचन हद्दीतील मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. तर मागील चोविस तासात उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत नवीन सात रुग्ण आढळुन आले आहेत.

Previous articleकास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर
Next articleहुतात्मा राजगुरू महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा